चार दिवसीय उर्दू कार्यपुस्तिका निर्मिती कार्यशाळा संपन्न....
∆चार दिवसीय उर्दू कार्यपुस्तिका निर्मिती कार्यशाळा संपन्न....
∆महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना लवकरच मिळणार कृतिपुस्तिका...
∆उर्दू भाषा विभागा मार्फत लर्निंग इन्हासमेंट प्रोग्राम....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
उर्दू भाषा विभाग महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत चार दिवसीय उर्दू भाषा कार्यपुस्तिका निर्मिती तिसरी कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेसाठी मा राजेश पाटिल साहेब भा प्र से संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे रमाकांत काठमोरे साहेब सह संचालक डॉ कमलादेवी आवटे उपसंचालक भाषा विभाग अरुण सांगोलकर उपविभाग प्रमुख तवसिफ परवेज सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले दिनांक 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत उर्दू भाषा विभाग मार्फत संपूर्ण राज्यातील उर्दू माध्यमातील इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्ती वर आधारित कृतीपुस्तिका निर्मिती कार्यशाळा महात्मा फुले हॉल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे येथे संपन्न झाली या कार्यशाळात राज्यातील मोठ्या प्रमानात तज्ञांची उपस्थिती होती तसेच श्री तवसिफ परवेज एम मुजफ्फर यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली व संपूर्ण राज्यातील उर्दू माध्यमाच्या इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना कशाप्रकारे सहजरीत्या कार्यपुस्तिका उपलब्ध करून देता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले कार्यपुस्तिका तयार करण्यासाठी इयत्ता सहावी इयत्ता सातवी इयत्ता आठवी अशाप्रकारे तीन वेगवेगळे ग्रुप तयार करून कार्यपुस्तिकाचे कार्य करून घेण्यात आले तसेच या कार्यशाळांमध्ये प्रूफ रीडिंग चे काम पूर्ण करून घेण्यात आले अशाप्रकारे या चार दिवसीय कार्यपुस्तिक निर्मिती कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाल्याबद्दल वरिष्ठांनी समाधान व्यक्त केले,या वेळी महाराष्ट्र राज्यातील तज्ञा मध्ये मोहम्मद इक्बाल सिद्दिकी जि प शाळा अंजी ता जि वर्धा डॉ अब्दुल राफे अब्दुल मलिक अब्दुल कादिर शेख फयाजोद्दीन शाहिद इक्बाल खान सरफराज खान जि प उर्दू शाळा महान बार्शीटाकली जि अकोला शेख शागिर्द अहेमद गुलशने अतफाल उर्दू शाळा उस्मानाबाद मो रिजवान अब्दुल रहीम डॉ मुबाशशीर इब्राहिम जमदार सिराज अली खान इकरा उर्दू शाळा परभणी डॉ सय्यद तबससुम अब्दुल मोहसीन अब्दुल मुनाफ जिल्हा परिषद उर्दू शाळा वाकळी ता जामनेर जि जळगाव अब्दुल्ला जिया अहमद शबाना जकीउद्दीन सिद्दिकी समीना नजीर खलिफा जिनत अय्युब शेख उस्मानी मन्सूर अखतर मो सलीम अब्रार आलम असरार दानिश मोहम्मद कमालोद्दीन जावेद अहेमद काजी माहेमुद नवाज राज्यातील उपरोक्त तज्ञांची सदर कार्यशाळाला उपस्थिती होती सदर कार्यशाळांमध्ये संपूर्ण प्रोफिडिंगचे काम महाराष्ट्र राज्यातील तज्ञांची हस्ते पूर्ण करण्यात आले. प्रतिनिधी , बार्शिटाकळी ,
*कृतिपुस्तिका विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरणार*
सध्या ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तज्ञांची हस्ते उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे विद्यार्थी कृती पुस्तिका तयार करण्यात येत आहे सदर पुस्तिका हे अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार करण्यात येत असून सदर कुर्ती पुस्तकाचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे अनिसोद्दीन कुतबोद्दीन
मुख्याध्यापक जिल्हा परिषद उर्दू शाळा इंदिरा आवास बार्शिटाकळी
Comments
Post a Comment