माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्या हस्ते प्रा.प्रियंका मसतकर यांना तेली समाज पुरस्कार....
माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्या हस्ते प्रा.प्रियंका मसतकर यांना तेली समाज पुरस्कार....
बार्शीटाकळी: तालुका प्रतिनिधी
बार्शीटाकळी येथील गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ,वनस्पती शास्त्र विभागात प्राध्यापिका असलेल्या प्रा.डॉ.प्रियंका मसतकर (वांदिले) यांना शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्यासाठी नुकतेच झालेल्या,संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमीत्ताने ,अमरावती येथे अ. भा.तेली समाज संघटनेच्या वतीने , मा. माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्या हस्ते तेली समाज पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या पुरस्कारासाठी त्यांच्यावर गुलाम नबी आझाद महाविद्यायातर्फे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने व इतर सर्वत्रच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment