महापुरुषांचा अवमान प्रकरणात वंचित युवा आघाडी आक्रमक, मार्केट मधून भीक गोळा करून 'मनोरुग्ण भाजपा उपचार फंड' म्हणून वेड्याच्या रुग्णालयास मनिऑर्डर पाठवुन केला निषेध.......
महापुरुषांचा अवमान प्रकरणात वंचित युवा आघाडी आक्रमक, मार्केट मधून भीक गोळा करून 'मनोरुग्ण भाजपा उपचार फंड' म्हणून वेड्याच्या रुग्णालयास मनिऑर्डर पाठवुन केला निषेध.......
अकोला दी. ११ -
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल आणि भाजपाचे पदाधिकारी सातत्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर,
म.जोतिबा फुले, सावित्रीआई फुले,शिक्षण महर्षी भाऊराव पाटील ह्यांचे विरुद्ध अवमानकारक वक्तव्य करीत आहेत.त्याविरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक झाली असून आज दुपारी स्थानिक फतेह चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, गांधी चौक, ताजना पेठ, महोम्मद अली रोड अशा मार्गाने मार्केट मधून एक एक रुपया 'भाजपा मानसोपचार फंड संकलीत' केला.२८९ रु जमा झालेली 'भिक' चंद्रकांत पाटील यांच्या उपचारासाठी ठाणे आणि नागपूर मेंटल हॉस्पिटला मनी ऑर्डर करण्यात आली आहे.भाजपाच्या मनुस्मृती धार्जिण वृत्तीची सामुहिक श्रद्धांजली अर्पण करीत भिक्षा मांगो आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांचा अवमान करण्यासाठी सुरू केलेल्या कृत्याने राज्यभर संतापाची लाट आहे.त्यात निषेध म्हणून शाईफेक करणारे मनोज गरबडे आणि इतर दोन कार्यकर्त्यांवर गँभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याने त्यात अधिकच भर पडली. ह्या दडपशाही आणि आवमाना विरुद्ध वंचित युवा आघाडीने रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला.भाजपचे मनोरुग्ण नेत्यांना दुरुस्त करण्यासाठी आणि त्यांच्या उपचारासाठी फतेह चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह चौक, भाजपा कार्यालय समोर जात गांधी मार्ग ते ताजना पेठ पोलिस चौकी मार्गे पुन्हा फतेह चौक अशी एक एक रुपया भिक्षा गोळा केली. भाजपा वाल्यांचा उपचारासाठी भिक कमी पडल्यास चंद्रकांत पाटलांची कीडणी विकुन उपचार पुर्ण करु असा निर्धार यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीने व्यक्त केला.
युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन शिराळे (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख),
जय रामा तायडे (महानगर अध्यक्ष अकोला पुर्व)
यांच्या नेतृत्वात मनोरुग्ण भाजपा उपचार भीक संकलन करण्यात आले.यावेळी अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संगीताताई अढाऊ,पूर्व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे, सीमांत तायडे, एड संतोष रहाटे, गजानन गवई ,धर्मेंद्र दंदी, रितेश यादव, कुणाल राऊत,राजकुमार दामोदर, अमोल जामनिक , अक्षय राठोड, उपसभापती अजय शेगावकर, विजय तायडे, संतोष गवई,अमित मोरे(पप्पू) , विकास सदांशिव , गजानन दांडगे, एड आकाश भगत ,विदेश बोराडे,रणजित तायडे ,धीरज इंगळे,राजेश बोदडे ,मंगेश सावांग, ऋषी बांगर,आकाश शेगावकर,अमोल कलोरे, सोनू शिरसाठ ,मोरेश्वर खंडारे, दीपक सावंग,संदीप दामोदर,सत्यम चौहान,राजेश मोरे, यासीन शेख, सुरेश करोल, रक्षक जाधव,सनी धुरंधर , स्वप्नील सोनोने, नंदू कोल्हटकर, कपिल पाटील ,प्रज्वल मेश्राम,विदेश बोराडे,अंकेश शिरसाट,रोहित जगताप,प्रा. सुरेश मोरे,अवधूत खडसे,राजेश अंभोरे , अभिजित अवचार,अक्षय डोंगरे,साहील गोपणारायन, आकाश नितोने, धम्मपाल तायडे,लवेश वरघट,पप्पू अरखराव,
योगेश आवळे,अजिंक्य चंद्रशेखर, विकास आठवले,
गोंडू अंभोरे व वंचित बहुजन युवा आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment