∆निंभोरा येथील प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींवर 307 या गुन्ह्याची वाढ करुन तात्काळ अटक करण्यात यावी........... ∆मुख्य सुत्रधार आरोपी शांताराम दाणे हा राज्याच्या सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष.......
∆निंभोरा येथील प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींवर 307 या गुन्ह्याची वाढ करुन तात्काळ अटक करण्यात यावी.......
∆मुख्य सुत्रधार आरोपी शांताराम दाणे हा राज्याच्या सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष........
अकोला - तेल्हारा तालुक्यातील निंभोरा बु. येथील बौद्ध समाजातील दामले परिवारावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. जिल्हाधिकारी अकोला यांना आरोपींवर 307 या गुन्ह्याची वाढ करुन तात्काळ अटक करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन दिले.
तेल्हारा तालुक्यातील निंभोरा बु. येथील बौद्ध समाजातील दामले परिवारावर 21 जानेवारी 2023 ला मध्यरात्री 11:30 वाजताच्या दरम्यान जातीवादामुळे आरोपी शांताराम दाणे याने आपल्या 30 ते 40 सह आरोपींसमवेत प्राणघातक हल्ला केला होता. या प्राणघातक हल्ल्याला आजपर्यंत 10 दिवस उलटून गेले तरी अटक करण्यात आली नाही. ह्या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हा राज्याच्या सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्याने त्याला व त्या सहकाऱ्यांना अद्यापही अटक करण्यात आली नसल्याने व सदर गुन्ह्यात 307 कलम नुसार गुन्हा दाखल केला नसल्याने आज वंचित बहुजन आघाडीने मा. जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर केले व येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही निवेदनातुन देण्यात आला. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, जि. प. अध्यक्ष संगीताताई अढावू, जि. प. उपाध्यक्ष सुनिलभाऊ फाटकर, महिला जिल्हा महासचिव सौ. शोभाताई शेळके, अॅड. संतोष राहाटे, शिक्षण सभापती सौ मायाताई नाईक, समाजकल्याण सभापती सौ आम्रपालीताई खंडारे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन शे मुक्तार, कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ योगीताताई रोकडे, जि. प. गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, मनपा गटनेते गजानन गवई, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, तालुका महासचिव शरद इंगोले, मोहन तायडे, बाळापुर पं. स. सभापती सौ. शारदा सोनटक्के, जि . प. सदस्य लिनाताई सुभाष शेगोकार, प्रकाश दामले, सुभाष शेळके, संदीप आग्रे, नितेश किर्तक, संदीप गवई, शुक्लधन वानखडे, सुरेंद्र तेलगोटे रवींद्र खर्च, मनोहर बेलोकार, शंकरराव राजुस्कर, विक्की इंगळे, सागर इंगळे, मधुकर इंगळे, पराग गवई, किशोर तेलगोटे, शिवचरण इंगळे, नरेंद्र सदांशिव, शिवचरण इंगोले, संजय कीर्तक, श्रीकृष्ण देवकुणबी, निशांत राठोड, हरिष रामचवरे, आशिष वानखडे, डॉ. विजय दामले, अक्षय गोपनारायण, सागर वानखडे, गटनेते तथा नगरसेवक सुनील विठ्ठलराव शिरसाट , नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, आनंद बोदडे, सौरभ बोडदे, लोकेश शिरसाट, प्रमोद गवई ,अमोल शिरसाट, वैभव खडसे, संतोष दामले, चक्रधर दामले, बाळासाहेब गडलिंग, उज्वला गडलिंग, नंदकिशोर दामले, रामदास दामले, नागेश शिरसाट, नाना अंभोरे, मनोज गवई, जम्मु पटेल, विश्वजीत खंडारे, महादेवराव नागे, खंडोजी घाटोळ, रणजीत तायडे, रमेश जाधव पंकज दामोदर, संकेत शिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment