अन्न व औषध प्रशासन विभाग अकोल्यातील अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करा - उमेश इंगळे

अन्न व औषध प्रशासन विभाग अकोल्यातील अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करा - उमेश इंगळे 
(महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेची मागणी)

संदर्भ - औवी/रुग्णालय १६६-२२/१५
दिनांक ०९/१२/२०२२ यांचे परिपत्रक
अकोला प्रती - रुग्णांना रुग्णालयातील औषधी दुकानातून औषधी करणे खरेदी करण्याची सक्ती केली जाते अशा तक्रारी वारंवार महाराष्ट्र राज्य रुग्नेसेवक संघटना व महाराष्ट्र प्रशासनास प्राप्त होत होत्या अशा प्रकारे रुग्णालयाने त्यांचे सलग्न दुकानातून औषधे खरेदी करण्याची रुग्णांना सक्ती करणे हे बाब नियमबाह्य आहे तरी या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की रुग्णालयातील औषधी दुकानातूनच रुग्णांनी औषधी खरेदी करावी अशी शक्ती नाही रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधाची खरेदी करू शकतात अशा आशयाचे फलक ठळकपणे संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना दिसतील अशा दर्शनी भागात प्रदर्शित करावा व अशा सूचना आपल्या मार्फत आपले विभागातील सर्व रुग्णालयातील परवानाधारक औषध विक्रेत्यांना देण्यात याव्यात अशा शासनाचा आदेश असतानाही अकोला जिल्ह्यातील शहरातील एका ही हॉस्पिटलमध्ये अश्या आशयाचे फलक लावण्याचे पत्र अन्न व औषध प्रशासन विभाग अकोला यांनी दिले नाही, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी स्वतः अकोल्या शहरातील हॉस्पिटलमध्ये जाऊन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या पत्रासह शासनाचे आदेश जोडुन फलक लावण्याचे मागणी केली होती परंतु अद्याप पर्यंत एकाही हॉस्पिटल मध्ये फलक लावले नाही म्हणून शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन विभाग अकोल्यातील अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे व ज्या हॉस्पिटल मध्ये अश्या प्रकारचे बोर्ड न लावणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी 
 अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजिराव सावंत, अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना ईमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे