बार्शीटाकळी न.प. मध्ये वंचित बहुजन आघाडी दोन सभापती पदांवर विजयी...

बार्शीटाकळी न.प. मध्ये वंचित बहुजन आघाडी दोन सभापती पदांवर विजयी..., 
 

आज दिनांक 18 1 2023 रोजी बार्शीटाकळी नगरपंचायत मध्ये सभापती पदांची निवडणूक झाली, यामध्ये वंचित बहुजन आघाडीला दोन सभापती पदांवर विजय मिळवता आला बांधकाम सभापती पदावर नसीम खान मास्टर , तर महिला बालकल्याण सभापती पदावर कमलाताई धुरंदर यांचा विजय झाला. त्याचप्रमाणे नगरपंचायत उपाध्यक्ष पद वंचित बहुजन आघाडी आघाडीकडे असल्यामुळे नियोजन समितीच्या सभापती पदावर उपाध्यक्ष सुरेश जामनिक यांची नियुक्ती झाली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी देंडवे, यांनी जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन यांच्या निवासस्थानी विशेष उपस्थिती दर्शवून नवनिर्वाचित सभापतींचे शाल व श्रीफळ देऊन सोबतच वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते त्यांनी सुध्दा नवनिर्वाचित सभापती यांचे स्वागत केले महानगरपालीकेचे माजी गटनेते गजानन गवई, संजय किर्तक , देवानंद तायडे , तालुकाध्यक्ष रतन आडे, अकोला पूर्व तालुका अध्यक्ष किशोर जामनिक, बार्शीटाकळी शहराध्यक्ष अजहर पठाण , अमोल जामनिक युवक ता.अध्यक्ष,जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन, सै रागीब हाजी साहेब, नगरपंचायत उपाध्यक्ष सुरेश जामनिक, गटनेते सुनील शिरसाट, नगरसेवक श्रावण भातखडे , तालुका संघटक हरीश रामचवरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते, साहिल गवई उपसरपंच दगडपारवा, श्रीकृष्ण देवकुणबी, अनिल धुरंदर, सनी धुरंदर भूषण सरकटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे