गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथक पिंजरची नवीन वर्षाला संकल्पना - जिवरक्षक दिपक सदफाळे
गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथक पिंजरची नवीन वर्षाला संकल्पना - जिवरक्षक दिपक सदफाळे
प्रतिनिधी बार्शीटाकळी
अकोला जिह्यातीलच नव्हे तर विदर्भातील एकमेव मानवसेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन महाराष्ट्र द्वारासंचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथक पिंजर दिपक सदाफळे,जिवरक्षक यांनी गेले अनेक वर्ष मोलाचे व कौतुकास्पद कार्य केले, पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली की, गणेेशोस्तव विसर्जन, दुर्गा माता उत्सव विसर्जन, गाडीचा किंवा बसचा अपघात झाल्यास अनेक महिला, पुरुष, बालमित्र व वेगवेगळ्या गावातील जीव तसेेच प्राण्याचे सुद्धा प्राण वाचविणारे असे जीवरक्षक त्याच्या कार्याची कुठे तरी दखल शासनाने घेतली पाहिजे.शासनाने या अशा मानव हीत जपणाऱ्या संस्थाना मान्यता देऊन कुठे तरी मान्यता देऊन एक मोलाचे कार्य करावे, त्याची मानव हितासाठी अनेक मोठया मोठया संकल्पना दरवर्षी असतात. या नवीन वर्षी नवीन संकल्पना आपत्ती व्यवस्थापन व सामाजिक व रुग्णसेवेचे जिवरक्षक सेवेचे 23 वर्ष उद्या यशस्वीपणे पुर्ण होत आहेत याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. सोबतच दि.1 जानेवारी 2023 रोजी दिपक सदाफळे जीवरक्षक यांचे निरोगी व यशस्वी असे 50 वर्ष पुर्ण होत आहे याचा सुद्धा सार्थ अभिमान त्यांना आहे. याच दीवसावर ते दरवर्षी एक संकल्पना घेऊन पुढे सर करीत असतात .दि.1जानेवारी 2023 पासुन घेऊन येत आहेत चालते फीरते आपत्ती व्यवस्थापन पथक, हेल्पलाइन- 9822229471 ज्यामध्ये नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचे निवारण करणे,ऑल डिझास्टर मॅनेजमेंट अँड रेस्क्यू सर्विसेस व सर्च रेस्क्यू सर्विसेस अँड ग्रामस्थर, तालुकास्थर, जिल्हास्थर, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि जणजागृती शोध व बचाव पथके निर्माण करणे, आपदा प्रबंधमित्रांची बांधणी आणि दर्जेदार प्रशिक्षण व समन्वय साधने,सामाजिक आणी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्राकडे प्रभावी वाटचाल.सर्व ह्यूमन डेव्हलोपमेंट समुपदेशन ऍक्टिव्हिटी प्रोग्राम राबवून त्यावर सोलुशन सांगणे, डीझास्टर मॅनेजमेंट रेस्क्यूअर डेव्हलोपमेंट प्रोग्राम विषयी मार्गदर्शन करून सर्व सुविधा तन मन धनाने राबविण्यात याव्या यासाठी नवीन वर्षा निमित्ताने संकल्पना राबविण्यात आली.
तर त्याची टीम मधील चमू यांनी मानवसेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन महाराष्ट्र द्वारासंचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथक पिंजर च्या माध्यमातून जुळून अनेक युवकांनी सुद्धा समाज हीत जोपासत या सेवे मध्ये सुरुवात केली. अशी माहिती दिपक सदाफळे पिंजर (जिवरक्षक) संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
Comments
Post a Comment