गुलाब नबी आझाद महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धनासाठी कार्यशाळा संपन्न.....
गुलाब नबी आझाद महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धनासाठी कार्यशाळा संपन्न.....
स्थानिक बार्शीटाकळी येथील गुलाब नबी आझाद महाविद्यालयात मा. जिल्हाधिकारी साहेब अकोला यांच्या आदेशाने मराठी भाषा संवर्धनासाठी उपक्रम राबणाच्या दृष्टीने दि १४/०१/२०२२ ते २८/०१/२०२२, पंधरवडा साजरा करण्यात सूचित केले आहे. याचाच एक भाग म्हणून स्थानिक पातळीवर महाविद्यालयात विविध उपक्रम राबवीत, साजरा करण्याच्या दृष्टीने मराठी भाषेचे महत्त्व व संवर्धन कार्यशाळा प्रचार्य डॉ मधुकर पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे असंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम दीपप्रज्वलन व स्वागत च्या कार्यक्रम आटोपल्यानंतर रासेयो चे डॉ. व्ही.एस उंडाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण केले व पाहुण्यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमा साठी अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉ. प्रवीण देशमुख, तर महाविद्यालयाचे संशोधक विद्यार्थी अतिथी म्हणून प्रा गजानन काळे व प्रा. निलीमा काळे हे उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये मराठी चारोळी, मराठी कविता, मराठीतून निबंध स्पर्धा व इतर मार्गदर्शन पर कार्यक्रम पार पाडण्यात आले. मराठी भाषेचे महत्व, प्रसार व संवर्धन करणे काळाची गरज असताना अशा कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालय स्तरावर करणे गरजेचे आहे. भविष्यामध्ये मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे ती मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनामध्ये वापरता आली पाहिजे, म्हणजेच भविष्यामध्ये तिचे संवर्धन होईल. महाराष्ट्रामध्ये जरी मराठी भाषेचा वापर होत असला तरी पण अजूनही बरेच विषय हे इतर भाषेमध्ये शिकवले जातात, त्याचाच परिणाम भविष्यात मराठी भाषेचे महत्व व संवर्धन करण्यासाठी अडथळा आणू शकते. हे मान्यवरांनी याप्रसंगी लक्षात आणले. संत वाड:मयीन अभ्यास कार्यक्रर्मामध्ये मराठी भाषेचे महत्व विशेष केले गेले परंतु मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी तिचा प्रचार, प्रसार वाढवायचा असेल, संवर्धन करायचे असेल, किंवा तिला टिकून ठेवायचे असेल तर मराठी भाषेचा आपण वापर केला पाहिजे, मराठीचा आदर केला पाहिजे, शक्य ते विषय मराठी भाषेतून शिकवले गेले पाहिजे. जर आपण मराठी भाषा संवर्धन केले नाही तर भविष्यात भाषेचा वापर कमी व्हायला वेळ लागणार नाही, यासाठी वेळेत सावध होणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाची यशस्वी आयोजन करण्यासाठी रा. से.यो. चे कार्यक्रम अधिकारी डॉ.व्ही.एस उंडाळ, डॉ.व्ही.बी.कोटंबे, चैतन इंगळे, गायत्री राठोड, साक्षी जाधव इ. यांनी अथक प्रयत्न केले. आभार प्रदर्शना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment