∆विज्ञान प्रदर्शनीचे इलेक्ट्रॉनिक समईचे बटन दाबून उद्घाटन प्रसंगी जि प अध्यक्ष व सर्व पदाधिकारी......... ∆जय बजरंग विद्यालय आयोजित विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थीयांन करिता प्रेरणादायी उपक्रम...जिप अध्यक्ष सौ संगीता अढाऊ
∆विज्ञान प्रदर्शनीचे इलेक्ट्रॉनिक समईचे बटन दाबून उद्घाटन प्रसंगी जि प अध्यक्ष व सर्व पदाधिकारी....
∆जय बजरंग विद्यालय आयोजित विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थीयांन करिता प्रेरणादायी उपक्रम...जिप अध्यक्ष सौ संगीता अढाऊ
बार्शिटाकळी : जय बजरंग विद्यालय रुस्तमबाद मध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनी हा तालुकास्तरीय उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे उद्गागार अकोला जि प अध्यक्ष सौ सुनीताताई आढाऊ यांनी आपल्या आयोजित उदघाटन भाषण प्रसंगी काढलेत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक तुकाराम बिरकड प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती मायाताई नाईक कृषी सभापती योगिताताई कोरडे गावचे सरपंच गजानन म्हैसणे ग्रामं दान मडळ अध्यक्ष दिगंबर म्हैसणे युवा नेता मनीष हिवराळे विदर्भ मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर सहसचिव गजेंद्र काळे तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष दिनकर गायकवाड विज्ञान मंडळ तालुका सचिव प्रभू चव्हाण गणेश म्हैसने प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते प्रथम फोटो पूजन करण्यात आले मंचावर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले प्रथम आगमन प्रसंगी जि प पदाधिकारी यांचा संस्थेचे संस्थापक प्राध्यापक तुकाराम बिरकड यांचे हस्ते करण्यात आला त्यानंतर 50 व्या विज्ञान प्रदर्शनीचे पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले जबरदस्त किल्ला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मॉडेल्स प्राथमिक माध्यमिक स्तरावरून आली होती आपल्या भाषणात शिक्षण सभापती सौ मायाताई नाईक यांनी उत्कृष्ट प्रदर्शनीचे नियोजना बद्दल आयोजक यांना धन्यवाद दिले तर कृषी सभापती सौ योगी ताई रोकडे यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागात एवढे उत्कृष्ट मॉडेल बघून आनंद व्यक्त केला माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी अध्यक्ष भाषणातून आजच्या या बाल वैज्ञानिकांना सौरऊर्जेबद्दल माहिती विशद करून ह्या सौर,उर्जा संदर्भात विविध मॉडेलची निर्मिती करावी असे सांगितले कार्यक्रमाचे संचालन माधव देऊळकार प्रास्ताविक प्रभू चव्हाण तर आभार प्रदर्शन पांडे यांनी केले
Comments
Post a Comment