नाभिक समाज प्रबोधन मेळाव्याला नाभिक बांधवांनी सहभाग नोंदवित उपस्थित राहावे !.....नगरसेवक भातखडे
नाभिक समाज प्रबोधन मेळाव्याला नाभिक बांधवांनी सहभाग नोंदवित उपस्थित राहावे !.....नगरसेवक भातखडे
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : शिवरत्न जिवाजी महाले व हुतात्मा विरभाई कोतवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त 16 जानेवारीला सकाळी अकरा वाजता संत सेना महाराज भवन एन 12 हडको औरंगाबाद येथे सकल नाभिक समाज प्रबोधन मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत तर उद्घाटक सोमनाथ साळुंखे सर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष मा. गोविंदजी दळवी सर, तर अध्यक्षस्थानी सोपानराव शेजवळ राज्य उपाध्यक्ष नाभिक महामंडळ औरंगाबाद, इत्यादी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत
नाभिक समाजातील विविध समस्याचा निपटारा करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी समाजामध्ये प्रबोधन होणे आवश्यक आहे या मेळाव्याच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन होणार आहे तरी अकोला जिल्ह्यातील नाभिक समाजातील जबाबदार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा नाभिक दुकानदार संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष श्रावण भातखडे यांनी केले आहे
Comments
Post a Comment