गुलाम नबी आझाद महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी......

गुलाम नबी आझाद महाविद्यालयात
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी....

बार्शीटाकळी : स्थानिक प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना, द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शीटाकळी जि अकोला, येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती कार्यक्रम प्राचार्य डाॅ. एम आर पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः प्रतिमेला हार, फुले अर्पण करून दीप प्रज्वलनाने झाली. अनेक प्रकारच्ये हाल अपेष्टा सहन करून सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडी केली. समाजाच्या अन्याय अत्याचार सहन करून त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण झाले. सावित्रीबाई फुले यांनी 1948 मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली. समाजामध्ये स्त्री पुरुष समानता निर्माण व्हावी यासाठी अथक प्रयत्न केले. महिला सक्षमीकरणाची गरज हे त्यांनी ओळखल्या असल्याकारणाने मुलींना शिक्षणाची गरज लक्षात घेता, अशा समाजाच्या भल्यासाठी त्या तत्पर कार्यरत होत्या. मुली शिकल्या तर त्या दोन्ही घराचा उद्धार करू शकतात. त्यामुळे मुलींना शिक्षण ही एक काळाची गरज आहे, त्यासाठी मुलींनी सावित्रीबाईचा आदर्श समोर ठेवावा असे या प्रसंगी आव्हान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्राचे व रासेयोचे डॉ व्ही एस उंडाळ व मराठीचे व रासेयोचे डॉ व्ही बी कोटुंबे मॅडम यांनी अथक प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख डॉ अनिल दडमल, डॉ सुधीर राऊत व इतर शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमांमध्ये रासेयोचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे