अतिक्रमण हटाव मोहिम गरिबांच्या जिवावर.......
अतिक्रमण हटाव मोहिम गरिबांच्या जिवावर....
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी येथे अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे या मोहिमेत जुने बस स्टॉन्ड आठवडी बाजार जवळील गरिब लघु व्यवसाहीकावर अन्याय होत असुन हे लघु व्यवसाहीक गेल्या ३० ते ४० वर्षा पासून व्यवसाय करत आहेत यामुळे आमच्या परीवाराचा उदरनिर्वाह सुरू आहे
या व्यवसायीकांना ग्रामपंचायत ने जागा भाडे तत्वावर दिली आहे त्यानुसार लघु व्यवसाहीक कराचा भरणा करत आहेत परंतु बार्शिटाकळी नगरपंचायत ने सुचना वा नोटीस न देता लघु व्यवसाहीकाना अतिक्रमण हटाव मोहिमेत त्यांचें व्यवसाय ( दुकाने ) हटवत आहेत
लघु व्यवसाहीकांची एकच मागणी केली की आम्ही ३/४ दशका पासुन ग्रामपंचायत/ नगरपंचायत चा कर भरत असुन आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी नंतरच आमचें दुकाने हटवावी अन्यथा आम्ही आमचे दुकाने नगरपंचायत कार्यालयात लावु अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी अकोला, मुख्याधिकारी नगरपंचायत बार्शिटाकळी, तहसिलदार साहेब, तथा पोलीस अधीक्षक अकोला व उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर यांना देण्यात आले यावेळी लघुव्यवसाहीकांनी आपल्या निवेदनात हेही म्हटले आहे की आम्हाला पर्यायी व्यवस्था होई पर्यंत याच जागेवर आमचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात यावी जेणेकरून आमच्या परीवाराचा उदरनिर्वाह सुरू राहील व. आमच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही
Comments
Post a Comment