गरोदर महिलेला उपचार न मिळाल्यामुळे बाळाच्या मृत्यू ला जबादार असलेले डॉक्टर वर कार्यवाही करा – उमेश इंगळे
गरोदर महिलेला उपचार न मिळाल्यामुळे बाळाच्या मृत्यू ला जबादार असलेले डॉक्टर वर कार्यवाही करा – उमेश इंगळे
अकोला - गरोदर महिलेला उपचार न मिळाल्यामुळे बाळाच्या मृत्यू ला जबादार असलेले डॉक्टर वर कार्यवाही करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे गरोदर महिलांना प्रसुतीकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा येथे आणले असता परंतु त्या ठिकाणी वैद्यकीय उपचार मिळाला नाही, आणि आरोग्य केंद्र बाहेरून परस्पर ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे घेऊन जात असताना रुग्णवाहिक तेच महिलेची प्रसूती झाली मात्र वेळेवर उपचार मिळून शकल्याने दुर्दैवाने बाळाचे मृत्यू झाल्याची तक्रार गर्भवती महिलेचे पती मनोहर इंगळे यांनी केली आहे. अशा प्रकारचे बातमी काही वर्तमान पत्रांमध्ये आलेली आहे.
गर्भवती महिला उषा इंगळे यांना प्रसूतीसाठी धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी त्यावेळेस केवळ परिचारका होती व कुठलेही प्रकारचे मोठे अधिकारी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी हजर नव्हते ही अत्यंत गंभीर बाब आहे व त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले नाही. जर त्या ठिकाणी त्या गरोदर महिलेला योग्य उपचार मिळाला असता तर आज ते बाळ जिवंत असतं परंतु डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे तिच्यावर उपचार झाला नाही त्यामुळे त्या ठिकाणी कर्तव्यावर हजर नसलेले डॉक्टर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक कामगार संघटनेच्या वतीने करण्यात अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्फत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
Comments
Post a Comment