∆पांदण रस्त्याबाबत कार्यशाळा...... ∆तालुका पत्रकार संघाचे वतीने आयोजन......
∆पांदण रस्त्याबाबत कार्यशाळा...
∆तालुका पत्रकार संघाचे वतीने आयोजन...
बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )
बार्शीटाकळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सध्या भेडसावत असणारा प्रश्न म्हणजेच शेतरस्ता , पांदन रस्ता . याबाबत अनेकदा वाद उत्पन्न होवून शेजारी -शेजारी वावर असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दुही निर्माण होवून जाते. याबाबत अनेकजण कोर्टात सुद्धा जातात . प्रसंगी वेळ व पैसा खर्ची पडतो . आयुष्यातील उमेदीचा, बराच कालावधी यात निघून जातो ! म्हणून शेतरस्ता ह्या विषयावर कार्यशाळा आयोजित केली असुन शेतरस्ता प्रकरणी अडचणीत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला उपस्थित राहण्यासाठी तालुका पत्रकार संघाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेत
मार्गदर्शक म्हणून मा.अभयसिंह मोहिते -पाटील (SDO)उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर हे मार्गदर्शन करणार असून सदर कार्यशाळा ही दि.५ जानेवारी २०२३ वार गुरुवार रोजी
सकाळी ११ वाजता पंचायत समीती सभागृह बार्शीटाकळी जि. अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे . या कार्यशाळेत पोहचण्यासाठी काही अडचण असल्यास , श्याम ठक 9975792520 , संजय वाट
9561653490 यांचेशी संपर्क साधण्याचे तालुका पत्रकार संघाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे .
Comments
Post a Comment