अकोट जिनिग प्रेसिंग निवडणूक 1800 मतदारांचा कल शेतकरी पॅनलला बंद जिनिगचा फटका सहकारला.....

अकोट जिनिग प्रेसिंग निवडणूक 1800 मतदारांचा कल शेतकरी पॅनलला बंद जिनिगचा फटका सहकारला.....
अकोट:-अकोट जिनिंग प्रेसिंग निवडणुकीची घमासान अंतिम टप्प्यात पोहचली असून मतदारांचा कल शेतकरी पॅनल कडे दिसत आहे. वेगवेगळ्या सहा मतदार संघातून या निवडणूक मध्ये एकवीस संच्यालक भविष्य 1800 मतदारांच्या हाती आहे बंद पडलेल्या जिनिंग मुळे सहकार पॅनलला जबर फटका बसणार असल्याचे चित्र आहे.
 अकोट तेल्हारा तालुक्यात मतदार असलेल्या अकोट जिनिंग प्रेसिंग ची निवडणूक गाजत आहे गेल्या 18 वर्षापासून जीन बंद पडलेला आहे. जीन कडे मोठी असेट व मोठे बॅंक बॅलन्स असतांनाही जीन बंद कसा पडला असा प्रश्न शेतकरी भागधारक विचारताना दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सहकार पॅनलची सत्ता जिनिंग मध्ये असताना काहीच न करू शकलेला गट आता नव्याने काय करणार आहेत असा प्रश्नही मतदार उपस्थित करीत आहे. एकंदरीत सहकार गटाच्या नाकर्तेपणाचे वाभाडे मतदार काढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी पॅनलने नव्या दमाचे सुशिक्षित व प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन जीन सुरू करण्याच्या आशा पल्लवीत केल्याने मतदारांचा कल शेतकरी पॅनल कडे वाढला असल्याचे अनेक मतदार बोलून दाखवीत आहेत नव्हे उघडपणे प्रचारात उतरलेले आहेत. 
मृत भागधारकांचे वारसांना भागधारक बनवून घेण्याची प्रक्रिया किचकट केल्याने शेकडो वारस भागधारक बनु शकले नाहीत.त्यामुळे ते मतदानापासून वंचित राहिले आहेत. शेतकरी पॅनल निवडून आल्यास ही प्रक्रिया सोपी करून सर्व वारसांना भागधारक बनवून घेण्यात येईल असे आश्वासन शेतकरी पॅनलचे प्रमुख माजी आमदार संजय गावंडे यांनी मतदारांना दिले आहे. विजय आपल्या हातुन निसटत असल्याचे बघून मतदारांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करीत आहेत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.सहकार गटाने मजबूत बॅंक बॅलन्सचा मुद्दा मतदारांपुढे ठेवला आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे