शेतकऱ्यांच्या कापूस व इतर पिकांचे हमीभाव वाढवून देण्यासंदर्भात वंचित ने दिले निवेदन......

शेतकऱ्यांच्या कापूस व इतर पिकांचे हमीभाव वाढवून देण्यासंदर्भात वंचित ने दिले निवेदन....
 

बार्शिटाकळी : वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रमोद भाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आज दिनांक 10/ 2/ 2023 रोजी अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे बार्शीटाकळी तालुक्यात सुद्धा तहसीलदार गजानन हामद साहेब यांना निवेदन देण्यात आले. उपरोक्त विषयाबाबत वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी तर्फे निवेदन देण्यात आले की बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन तसेच इतर पिकांचे हमीभाव वाढवून देण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांवर आत्महत्या करण्याची तसेच उपासमारीची वेळ येणार नाही. मागील वर्षात कापूस या पिकाला 13000 प्रतिक्विंटल भाव होता अगोदरच तालुक्यातील शेतकरी दुष्काळग्रस्त असून पाहिजे तेवढे उत्पन्न शेतामध्ये राबवून सुद्धा शेतकऱ्याला पिकले नाही. तरी सदर निवेदनाची गांभीर्याने आपल्या स्तरावरून दखल घेण्यात यावी व शासनाकडून तसा प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निवेदन वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी तालुका तर्फे देण्यात येते. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
रतन आडे ता अध्यक्ष, अजय अरखराव ता. महासचिव, अमोल जामनिक युवा ता अध्यक्ष, मिलिंद करवते ता प्रसिद्धी प्रमुख, हरीश रामचवरे तालुका संघटक, वैशालीताई कांबळे महिला आघाडी तालुकाध्यक्ष, सुनिता धुरंदर बार्शीटाकळी शहराध्यक्ष, सिंहासन जाधव माजी तालुकाध्यक्ष, प्रवीण वानखडे माजी शहर सचिव भूषण खंडारे माजी सचिव, शुद्धोधन इंगळे माजी तालुका प्रवक्ता, रामदास गाडगे पंचायत समिती सदस्य, त्र्यंबक गवई, ज्येष्ठ नेते, रोहिदास राठोड पंचायत समिती सदस्य, दादाराव पवार पंचायत समिती सदस्य, सुनील शिरसाट गटनेता तथा नगरसेवक नगरपंचायत बार्शीटाकळी, श्रावण रामदास भातखडे नगरसेवक, विलास वाहूरवाघ, विश्वजीत खंडारे, शुभम खरात, श्र्र्डे  निर्मलाताई खाडे  जी. का सदस्य, कीर्ती पवार,साहिल गवई उपसरपंच दगडपारवा, विलास शिरसाट, गजानन ओमर, निलेश इंगळे, हरीश गुडघे, सुधीर राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे