जी एन ए महाविद्यालयात कॉपीमुक्त अभियान यशस्वी....
जी एन ए महाविद्यालयात कॉपीमुक्त अभियान यशस्वी......
बार्शिटाकळी - प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती हिवाळी परीक्षा २०२२ ही महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थापक अध्यक्ष डॉ मधुकरराव पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये अतिशय शांततामय वातावरणात कॉपीमुक्त परीक्षा पार पडली तब्बल ही परीक्षा एक डिसेंबर २०२२ ते एकूणच तीन महिने ही परीक्षा चालली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कला वाणिज्य व विज्ञान तसेच बी होक या शाखेच्या अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या हिवाळी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. एक डिसेंबर २०२२ ते २१ फेब्रुवारी २०२३ अशी ही दीर्घकाळ परीक्षा कॉपीमुक्त वातावरणामध्ये संपन्न झाली या कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थ्यांनीही तेवढाच सकारात्मक प्रतिसाद दिला. गतकाळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अतिरिक्त वेळ देऊनही पाहिजे तसा निकाल लागला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता डॉ मधुकरराव पवार यांनी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले एकूणच या परीक्षेमध्ये ३०६२ हून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते प्राचार्य डॉ मधुकरराव पवार यांच्या मार्गदर्शनात केंद्राधिकारी प्रा डॉ दिपक आनंदराव चौरपगार सहकेंद्राधिकारी डॉ किरण वाघमारे यांनीही परीक्षा संचलित केली तर या परीक्षेसाठी प्रा डॉ प्रवीणकुमार राठोड, प्रा संजय चव्हाण, संजीत राठोड, विशाल राठोड, विजय ढिसाळे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण परीक्षा ही कॉपीमुक्त शांततामय वातावरणामध्ये संपन्न झाली
Comments
Post a Comment