_श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त_ श्री क्षेत्र आकोली जहागीर सजल विहीर वारीतीर्थ श्रींचा पायदळ दिंडी पालखी सोहळा.....

_श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त_
श्री क्षेत्र आकोली जहागीर सजल विहीर वारीतीर्थ श्रींचा पायदळ दिंडी पालखी सोहळा.... 

आकोट : समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त दरवर्षी श्री संत वासुदेव महाराज यांचा पायदळ दिंडी पालखी सोहळा श्री क्षेत्र आकोली जहागीर येथील श्रींनी सजल केलेल्या विहीर दर्शन वारीतीर्थ जात असतो. श्री क्षेत्र श्रद्धासागर, आकोट येथून टाळकरी, वारकरी, पताकदारी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, अब्दागिरी, रथ यात्रा, असंख्य महिला-पुरुष यांना घेऊन श्री संत वासुदेव महाराज आपले कुलगुरू श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाकरिता रविवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. दिंडी पालखी सोहळ्याने निघत आहेत. 
            श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे सकाळी श्रींचा विधीवत अभिषेक होऊन श्री शिवाजी महाविद्यालय, शनिवारा, यात्रा चौक, श्री संत वासुदेव महाराज निवासस्थान, श्री दुर्गा माता मंदिर मैदान, श्री संत गजानन महाराज मंदिर परिसर या मार्गे आकोट नगरीतून श्रींची भव्य रथयात्रा संपन्न होणार आहे. यानंतर ग्राम वाई येथे श्री बंडूभाऊ ठाकरे यांच्याकडे पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांसाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे अल्पशा विसाव्यानंतर श्री क्षेत्र आकोली जहागीरकडे श्रींचा पालखी सोहळा दुपारी ३ वा. रवाना होईल. श्री वासुदेवराव महाराज महल्ले यांच्या मळ्यामध्ये अल्पोपहार व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून पुढे श्री संत गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर श्री क्षेत्र आकोली जहागीर शेत सर्व्हे नंबर ५२ येथे दुपारी ४ वाजता श्रींच्या पालखी सोहळ्याचे आगमन होईल. येथे श्रींच्या तीर्थ-प्रसादाचा लाभ व श्री दर्शन घेऊन श्री क्षेत्र आकोली जहागीर ग्रामामध्ये दिंडी नगर प्रदक्षिणा होणार आहे. या दरम्यान ग्रामपंचायत भवन येथे सरपंच अरुण वाथे, उपसरपंच पंकज ढेंमरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच,अमोल बदरखे, प्रशांत बोरखडे, बाळासाहेब जायले, बाबा पा. जायले, किरण हरणे, दिलीप जायले, माजी मंडळ अधिकारी पुरुषोत्तम उकळकर, राजेंद्र उकळकर, नंदकिशोर इंगळे, पांडुरंग अस्वार, श्री अशोक महाराज जायले, माजी सरपंच दिनेश मुन व मित्रपरिवार, श्री उमेश जायले यांसह असंख्य गावकरी भाविकांकडून सपत्निक श्रींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत, पूजन होणार आहे. तसेच भूषण निचळ, रामदास वाडोकार, उकळकर साहेब यांचे अश्व दिंडी-पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन श्रींचे भावपूर्ण स्वागत होणार आहे. 
              रात्री श्रींच्या सजल विहिरीवर हा पालखी सोहळा मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी श्रींच्या प्रगट दिन उत्सवामध्ये सर्व भाविकांसह सहभागी होणार आहे. तरी, या राजवैभवी पालखी सोहळ्याचे आपण मानकरी, साक्षीदार व्हावे. सुयोगाने श्रींचा पालखी सोहळा रविवारी येत असल्यामुळे शासकीय, निमशासकीय व इतर कर्मचारी बंधू-भगिनींना ही सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. श्री क्षेत्र आळंदी, पंढरपूर पायदळ वारी ज्या भाविकांना शक्य होत नाही. त्यांनी केवळ १० कि.मी.पायी पदयात्रा करून शेगावप्रत वारीचा, श्रींच्या तीर्थप्रसाराचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोट यांचेकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे