वंचित चे लखन इंगळे यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या मागणीला यश....
वंचित चे लखन इंगळे यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या मागणीला यश.....
अकोट : गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट शहर यांनी दि.8.12.2022 रोजी मा.कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग अकोला क्रं.548c यांना निवेदन दिले निवेदन मध्ये मागणी अशी होती की काही वर्षे पूर्वी एम. एस. खुराना इंजिनिरिंग लिमिटेड व के. अँड. जे. प्रोजेक्ट प्राव्हेट लिमिटेड यांनी अंजनगाव रोड चे काम केले असुन काही रहिवाशी वस्ती ठिकाणी झेब्रा क्रॉस पट्टे गतिरोधक टाकले नाहीत या मुळे अंजनगावरोड आकोट येथे अपघात जास्त प्रमाणात होत आहेत अंजनगाव रोड सत्तीमैदान आकोट हे रहिवाशी मुख्यवस्ती असुन या रोडने नागरिक व शाळेतील लहान मुले पाई येजा करतात या रहिवाशी ठिकाणी वाहन हे भरधाव वेगाने येत असुन येथे गतिरोधक /झेब्रा क्रॉस पट्टे याचे काम त्वरित करण्यात यावे जेणेकरून अपघात होणार नाहीत जर का काम नाही केल्यास कार्यालया समोर आंदोलन करू असा इशारा लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांनी दिला होता व त्यावर वारंवार पाठपुरावा केला या वर संबंधित अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन अंजनगाव आकोट रोडने मुख्य ठिकाणी रोडवर झेब्रा क्रॉस पट्टे करून दिले
या मुळे स्पीड ने येणाऱ्या गाड्याला गती मिळेल व अपघात होणार नाहीत या आमच्या मागणीला यश आले हे आमच्या सोबत असलेले वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाअध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे माजी जिल्हा अध्यक्ष प्रदिप वानखडे वरिष्ठ नेते सुनील अंबळकाळ तालुका अध्यक्ष चरण इंगळे शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे माजी शहर उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे नितीन तेलगोटे व रहिवाशी नागरिक यांचे मुळे या मागणीला यश आले असेच जर कोणत्याही परिसरातील समश्या किंवा प्रॉब्लेम असल्यास आम्हाला कळवा आम्ही जनतेसाठी कधी पण तत्पर आहो असे वंचित बहुजन आघाडी चे शहर उपाध्यक्ष लखन इंगळे यांनी कळविले
Comments
Post a Comment