वंचित बहुजन महिला आघाडी ची सांत्वन पर भेट......

वंचित बहुजन महिला आघाडी ची सांत्वन पर भेट...... 
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी 
आज दि. ३/२/२०२३ बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवन येथील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या व राहायला स्वतःचे घर नसलेल्या प्रल्हाद शेळके व सुनिता शेळके यांच्या मृत्यूनंतर त्यांची तिन्ही मुले अनाथ झाली आहे ही बातमी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा प्रभाताई शिरसाट तसेच जिल्हा परिषद अकोला च्या समाज कल्याण सभापती सौ. आम्रपाली खंडारे यांना कळताच त्यांनी थेट टिटवन गाव गाठून या आई-वडिलांचे छत्र हरवलेले मंगेश वय 16 सावित्री वय 14 व राधिका वय 11 या मुलांची भेट घेऊन त्यांना होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासित केले व तसेच लहान मुली ला जिल्हा अध्यक्षा प्रभाताई शिरसाठ यांच्या शाळेत अ‍ॅडमिशन तसेच त्याचा राहण्याचा आणी ईतर सर्व खर्च जिल्हा अध्यक्षा प्रभाताई शिरसाट यांनी करण्याची जबाबदारी घेतली तसेच समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे तसेच जिल्हा अध्यक्षा प्रभाताई शिरसाठ यांनी आर्थिक मदत सुद्धा केली. 
त्यांच्या सोबत न प बार्शीटाकळी चे गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाठ तसेच महिला आघाडी च्या तालुका अध्यक्षा सौ वैशाली कांबळे, निर्मला खाडे, बार्शिटाकळी वंचीत चे युवा तालुका अध्यक्ष अमोल जामणीक कुणबी सामाजाचे नेते श्रीकृष्ण देवकुणबी आणि ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे