गुलाम नबी आझाद महाविद्यालयात संत शिरोमनी सेवालाल महाराजांची जयंती साजरी....
गुलाम नबी आझाद महाविद्यालयात संत शिरोमनी सेवालाल महाराजांची जयंती साजरी....
बार्शीटाकळी :
स्थानिक प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना, द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शीटाकळी जि अकोला, येथेे राष्ट्रीय सेवा योजना चे विद्यार्थी व शिक्षकांनी संतशिरोमणी सेवालाल महाराज यांच्या २८४ व्या जयंती निमित्त प्रतीमेचे पुजन करून विनम्र अभिवादन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकरराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती साजरी करण्यात आली.
समाजाचे आराध्य दैवत , जगाला शांतीचा संदेश देणारे संतशिरोमणी सेवालाल महाराज यांचे कार्य सर्व समाजाला आदर्श शिकवण देते. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ते समाज सुधारक व क्रांतिकारी भगवंत ठरले. त्यांच्या मते, 'प्रत्येक कणांकणांमध्ये परमेश्वराचा अंश आहे'. त्यामुळेच त्यांनी प्राणीहत्येला विरोध केला. सत्य, अहिंसा आणि न्याय ह्या तत्त्वांचा पुरस्कार करून त्यांनी समाज परिवर्तन घडविण्याचा फार मोठा प्रयत्न केला. जयंती साजरी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आर आर राठोड यांच्या उपस्थितीत, डॉ वाघमारे, डॉ चौरपगार, डॉ डी एस राठोड, डॉ बि एस खान, डॉ चव्हाण, प्रा बोराडे, डॉ एम बी बल्लाळ, डॉ कोल्हे, श्री पंजाब राठोड, श्री नामदेवराव, चैतन्य इंगळे व इतर उपस्थित होते. संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डॉ व्ही एस उंडाळ व डॉ व्ही बी कोटंबे सोबतच विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment