ग्रामीण रुग्णालय, बार्शीटाकळी येथे आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर संपन्न.....
ग्रामीण रुग्णालय, बार्शीटाकळी येथे आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर संपन्न.....
बार्शीटाकळी: अकोला जिल्हयातील आरोग्य विभागाच्या आदेशानुसार बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयात गुरुवार, ९ फेब्रुवारीला आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच जागरूक पालक-सुदृढ बालक कार्यक्रमाचे ऑनलाइन उदघाटन बाबासाहेब धाबेकर विद्यालयात करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन व संचालक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना हाडोळे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिरात ४० गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच ६० विद्यार्थ्यांची सुदृढ आरोग्याची तपासणी करण्यात आली. या वेळी आयोजित रक्तदान शिबिरात रक्त संकलन डॉ. हेगडे बँकेकडून करण्यात आले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भावना आडोळे, वैद्यकीय डॉक्टर महेश राठोड ,डॉक्टर श्वेता वानखडे ,डॉक्टर स्नेहल वानखडे, डॉक्टर सपना पाटील ,डॉक्टर पंकज इंगोले , डॉक्टर मनीष मेंन , मेडिसिन वितरणात अर्चना शर्मा , सिस्टर गाडेकर , सोनवणे , गवई , प्रभाकर तिडके, राम बायस्कर , शीतल राहाणे डांगे , अरविंद पारसकर आदींनी परिश्रम घेतले
Comments
Post a Comment