न.प.बार्शिटिकळी कडुन मुलभूत सुविधा मिळण्यासाठी ग्रीन कॉलनी वासियांची मागणी....
न.प.बार्शिटिकळी कडुन मुलभूत सुविधा मिळण्यासाठी ग्रीन कॉलनी वासियांची मागणी....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : स्थानिक बार्शिटाकळी येथील वार्ड क्रमांक २ मधील ग्रीन कॉलनी वासियांनी नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारी नगरपंचायत बार्शिटाकळी यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्यापासून आजपर्यंत ग्रीन कॉलनी विकासापासून वंचित राहिली आहे वार्ड क्रमांक दोनच्या भागात ग्रीन कॉलनी या भागामध्ये प्रशासक म्हणून नगरपंचायतचा कारभार श्री नंदू परळकर हे सांभाळत होते तेव्हा त्यांच्या प्रयत्नाने एक रोड पाच करून त्यांनी स्वतः बनवला होता पण ते गेले तेव्हापासून जनतेचे सरकार म्हणून निवडणूक होऊन जनता मधून नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले तेव्हापासून ग्रीन कॉलनी या भागाचा कोणी वालीच नाही असे सांगितले तरी चालेल नगरपंचायत मध्ये जेव्हापासून निवडून आलेले पदाधिकारी बसले तेव्हापासून या भागात विकास कामे तर दूरच एक साधी नाली व कोणतेच रस्त्याचे काम केले गेले नाही या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या मताचा अधिकार बजावला होता पण नगरसेवक असो की नगराध्यक्ष कोणीही ग्रीन कॉलनी कडे पाहायला सुध्दा आले नाही.
तरी ग्रीन कॉलनी वाहिन्यांच्या मागणी नुसार नगरपंचायत प्रशासनाने ग्रीन कॉलनी मध्ये रस्ता, नाली, पथदिवे,या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अन्यथा ग्रीन कॉलनी वासी येणाऱ्या निवडणुकीत निवडणुकीवर बहिष्कार टाकेल या निवेदनावर शे. इब्राहिम मो. नवाज, वसीम बेग.फइम बेग, सै. अयकर है. मिर, सै अबरार. सै मुसा, सै नसीम सै. नुर ,सै.रिजवान सै. मोबीन, शेख सलीम शे. करीम, इमरान उल्ला खा. रफु खा, मो. परवीन.अ. रफीक, अ.शफीक अ.रशीद , मो.साबीर मो. जाहेद, सै ईशाक सै. इसा, शेख सलीम शेख हुसैन इत्यादी ग्रीन कॉलनी मधील नागरीकांची मागणी आहे.
Comments
Post a Comment