महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत सहा. कार्यक्रम अधिकारी , तांत्रिक सहा. क्लर्क कम डाटा यांच्या प्रमुख मागणी करीता एक दिवशी धरणे आंदोलन......
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत सहा. कार्यक्रम अधिकारी , तांत्रिक सहा. क्लर्क कम डाटा यांच्या प्रमुख मागणी करीता एक दिवशी धरणे आंदोलन....
अकोला: महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत सहा. कार्यक्रमाधिकारी तांत्रिक साहेब क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या प्रमुख मागणी करीता एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचारी मागील 10 ते 12 वर्षापासून प्रामाणिकपणे अखंडित महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेची कामे करीत आहेत व वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेली कामे व जबाबदारी ते व्यवस्थित पार पाडत असून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे वेळेवर पूर्ण करीत आहेत त्याचप्रमाणे कोविड 19 अशा महामारीच्या काळात सुद्धा त्यांनी नियमित कार्यरत राहून स्वतःच्या जीवाची परवा न करता व त्यांना कोणत्याही शासकीय सुविधा नसताना सुद्धा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत योजनेचे गावांमधील प्रत्येक मजुरांना फार मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करून देऊन रोजगार दिलेला आहे असे असताना सुद्धा मागील तीन चार वर्षापासून त्या कंत्राटी कर्मचारी यांना कोणत्याही मानधनात वाढ झालेली नाही संदर्भीय पत्र क्रमांक दोन विषयांन्वये सीएससी मार्फत नियुक्ती करण्यात आलेली होती त्यावेळी सुद्धा संघटनेच्या वतीने त्यांनी बहिष्कार टाकलेला होता व मंत्रालय स्तरावरून सभा आयोजित केलेली होती त्यामध्ये सी एस सी कसे उपयुक्त आहे हे त्या कर्मचाऱ्यांना सुचविले परंतु सदर सीएससी मार्फत कर्मचारी यांना किमान वेतन व वैधानिक वजावटीचा फायदा दिला जात नव्हता हे कारण दाखवून आपल्या स्तरावरून संदर्भीय पत्र क्रमांक तीन अन्वये ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे ही कंपनी मनुष्यबळ पुरवणारी संस्था दिनांक 2 जानेवारी 2023 शासन परिपत्रकानुसार लागू करण्यात आली परंतु सदर कंपनी सुद्धा ED च्या जाळ्यात अडकल्याची बाब पुढे आलेली आहे व वारंवार अशा कंपन्या बदल केल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे असताना सुद्धा योजनेमध्ये काम करणारे काही निवडक कर्मचारी हे राज्य निधी असोसिएशन मधूनच नियुक्ती सह मानधन घेत आहेत व काही कर्मचारी कंपनीमार्फत काम करीत आहेत एकाच योजनेत काम करीत असताना वेगवेगळ्या निधीतून त्यांची निवड करणे व मानधनात तफावत असणे हे संयुक्तिक नाही त्यामुळे कत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा मानधन व नियुक्ती राज्य निधी असोसिएशन म्हणून देण्यात यावे तसेच सप्टेंबर 2019 पासून अजता गायत त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधनात कुठलीही वाढ झालेली नाही त्यामुळे शासन व प्रशासन यांचे लक्ष वेधण्याकरिता व खालील मागण्याची पूर्तता करण्याकरता दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हाधिकाऱ्याला समोर एक दिवशीय धरणे आंदोलन केले आहे सदर आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी सहित सदस्य मोठ्या प्रमाणात हजर होते सदर धरणे आंदोलन सकाळी दहा वाजता पासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हाधिकार्यालय कार्यालय संपन्न झाले व दुपारी चार वाजता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
सदर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे
1, मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कचराटी कर्मचारी यांचे आकृतीबंध मध्ये समायोजन करण्यात यावे
2, पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे
3,योजनेतील सर्व कचराटी कर्मचारी यांना राज्य निधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी
4, ग्राम रोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात यावे
5,मध्य प्रदेश शासनाप्रमाणे वयाच्या 62 वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी
या प्रमुख मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन केले होते व आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनात संदिप झाडोकार अध्यक्ष, राजेंद्र गुल्हाणे, संतोष इंगळे, गणेश कवळे, आनंद जानोदकर, राहुल पागृत, संतोष ईरच्छे, ज्योती वाहुरवाघ, रितेश सोनोने, अश्विनी चव्हाण, पंठक तायडे, सचिन घाटे, रूमालशिंग निंगवाल आदी कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर धरणे आंदोलनात सहभागी झाले होते
Comments
Post a Comment