आई वडीलाच्या सेवेसाठी धार्मिक ज्ञान होने गरजेचे.... ; मौलाना मोहम्मद उसमा
आई वडीलाच्या सेवेसाठी धार्मिक ज्ञान होने गरजेचे.... ; मौलाना मोहम्मद उसमा
बार्शिटाकळी : स्थानिक मकतब (मदरसा) अबु हुरैरा आकोली बेस इदगाह येथे वार्षिक स्नेसंमेलनाचे प्रमुख वक्ते मौलाना मोहम्मद उसामा (मुंबई) यांनी आई वडील यांच्या सेवे साठी धार्मिक ज्ञान असणे गरजेचे असल्याचे उदगार त्यांनी आपल्या प्रमुख भाषणात सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दारुल उलूम इल्यासिया मंगरुळपिर चे मौलाना मोहम्मद इस्माईल खान तर प्रमुख अतिथी म्हणून भरनी मस्जिद गोली बार मुंबई चे इमाम व खतीब मुफ्ती शोएब खान,दाई इलललाह मौलाना मोहम्मद ऊसामा मुंबई हे होते. मदरसा मकतब मध्ये एकूण 80 विध्यार्थी विद्यार्थिनी असून वर्ष भारत पूर्ण हजेरी लावणाऱ्या विद्यार्थी अब्दुल अनस अब्दुल जब्बार ला सायकल तर विद्यार्थिनी आयशा सिद्दिका अब्दुल सादिक ला शिलाई मशिन बक्षीस देण्यात आले असून नाझेरा कुराण पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्यार्थी ना डिनर सेट व दिनी पुस्तके तसेच सर्व विध्यार्थ्यांना कांचाच्या कटोरी सेट चे बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी मदरसा (मकतब) अबू हुरेरा च्या विद्यार्थी, विध्यर्थिनी यांनी नात शरीफ, ड्रामे, आदी कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे आयोजन करण्या साठी इदगाह परिसरातील युवकांनी सहकार्य केले असुन संचलन मौलवी अब्दुल वाजिद परतवाडा यांनी केले.कार्यक्रम यशसवीतेसाठी संचालक मौलाना मुशीर खान,हाफीज फैजान जमदार,हाफीज जूनैद,हाफीज कबीर व हाफीज जिया आदींनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment