भेंडीमहाल येथे रा.से.यो. श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन संपन्न.........
भेंडीमहाल येथे रा.से.यो. श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन संपन्न.......
बार्शिटाकळी : बार्शीटाकळी येथील प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाब नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शीटाकळी जि. अकोला, राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे 2022-23 सत्रातील आयोजन पिंजर मार्गावरील भेंडीमहाल येथे दि. 26-फेब्रुवारी ते दि. 5 मार्च, दरम्यान संपन्न होत असून, उद्घाटनाचा समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार यांच्या अध्यक्षते खाली मोठ्या उत्सुकतेने पार पडला.
गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच सौ उमीताताई स.राठोड, उपसरपंच दिनेश.वि.राठोड, पोलिसपाटिल राजकुमार म.महल्ले, मुख्याध्यापक शाम गुगळे, तंटामुक्ती अध्यक्ष तथा ग्रामपंचायतीतील सर्व सन्माननीय सदस्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिबिराची उत्तरोत्तर प्रगती सुरू आहे, दुसऱ्या दिवशी उद्घाटनाच्या प्रसंगी अनेक मान्यवरांच्या उपस्तिथित उद्घाटनाचा दिमागदार संभारभ संपन्न झाला. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी संत गाडगे महाराज यांची आदर्श शिकवण ग्रामविकासाला प्रेरणादायी ठरत आहे, संत गाडगे बाबाची दशसुत्री तसेच इतर संताची शिकवण, माणूस माणसाला जोडण्या बद्दलची प्रेरणात्मक शिकवण, समाजाची अधोगती कशी रोखते याबद्दल भााषनामधुन सांगितले. पुढे बोलतांना शिबिराचे रा.स.यो चे कार्यक्रम अधिकारी तथा सहाय्यक प्राध्यापक डॉ व्हि एस उंडाळ, यांनी त्यांच्या प्रास्तावीक भाषणामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा, श्रमदानाची तयारी, वेगवेगळे लघुप्रकल्प, आरोग्य तपासणी शिबिर, अंधश्रद्धा निर्मुलन, बेटी बचाव बेटी पढावो, कायदे विषयक कार्यक्रम, वृक्षसंवर्धन, ग्रामस्वच्छता व इतर कार्यक्रमा बद्दल माहिती दिली. पुढे बोलतांना डॉ. व्हि.बी. कोटंबे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात श्रम आणि संस्कार या दोन्हींचा संगम विद्यार्थ्यांच्या जीवनात किती महत्वाचा आहे, आणि यांच्या मधूनच युवक घडत असल्यामुळे ती प्रत्यक्ष आचारणात आणणे हे त्यापेक्षा महत्वाचे आहे असे उदभोधन केले. या प्रसंगी डॉ.एम.आर अहीर यांनी श्रमसंस्कार शिबिराचे महत्व विशद केले. शेवटच्या व विस्तारित अध्यक्षांच्या भाषांना मध्ये डॉ. मधुकरराव पवार यांनी त्यांच्या शैली मध्ये विविध उदाहरणे देऊन माणूस माणसापासून दुरावत आहे, त्यांना जोडण्याचे काम खऱ्या अर्थाने युवकच करू शकतो, किबंहूना याचे संपूर्ण ताकत फक्त युवकांमध्येच आहे आणि म्हणुण युवकांनी समोर येणाची नितांत आवश्यकता आहे. आशी खंत व्यक्त करून आव्हान केले. पुढे गाडगे बाबांचा संदेश दारोदारी पोहचविण्याचे काम सुद्धा युवकच करू शकतात असे सांगितले, विविध संतांची शिकवण विशेषता, संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या शिकवणीवर लक्ष केंद्रीत करून अश्या संतांची शिकवण समाजाला उच्च दिशा देण्याचे काम कारीत आहे, असे प्रतीपादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिबिरामधील विद्यार्थीनी गायत्री अव्हाळे यांनी केले तर आभार प्रदशनाची धुरा शिबिरातील आदर्श विद्यार्थी ऋशिकेष चव्हान यांनी पार पाडली. संपुर्ण शिबिराचे आयोजन व उदघाटन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यासाठी रा. स.यो चे कार्यक्रम अधिकारी डॉ .व्हि.एस.उडाळ, डॉ.व्हि.बी. कोटंबे, डॉ एम आर अहीर तथा शिबिरातील विद्यार्थी चैतन्य इंगळे, साक्षी घुले, सर्वज्ञा सुकळकर, श्रुती करपे, शिवानी कराळे, अमोल चव्हान,सागर राठोड यांनी अथक परिश्रम घेतले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment