भेंडीमहाल येथे अंधश्रद्धा निर्मूलन तथा आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व तपासणी शिबीर.......
भेंडीमहाल येथे अंधश्रद्धा निर्मूलन तथा आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व तपासणी शिबीर......
बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल
स्थानिक बार्शीटाकळी येथील गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी जिल्हा अकोला, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रम संस्कार शिबिराच्या तिसऱ्या दिवसाच्या बौद्धिक सत्रा मध्ये लाभलेले गावचे पोलिस पाटील राजकुमारजी महल्ले यांच्या अध्यक्षतेखाली अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज या विषयावर समितीचे अध्यक्ष ॲड. अनिल लव्हाळे, चंद्रकांत झटाले तथा धर्मदीप इंगले यांची उपस्थिति होती. सोबतच दुसऱ्या विषयावरती शासकीय आयुर्वेदिक विज्ञान महाविद्यालय तथा रुग्णालय, अकोला येथील आयुर्वेद तज्ञ डॉ. अश्विन इंगळे, डॉ.शुभम माळी व संपूर्ण टीम यांनी गुदविकार व उपाय योजना आणि तपासनी शिबिर करिता उपस्थित होते.
अंधश्रध्दा निर्मूलन काळाची गरज या विषयावर आजचे ज्वलंत प्रश्न यावर ॲड. अनिल लव्हाळे यांनी प्रकाश टाकला. अंधश्रध्दे वर बोलतांना आजही समाजात डिजिटल युगा मध्ये, अंधश्रध्दे मध्ये गुरफटलेल्या लोकांना बाहेर काढन्याची किंबहूना त्यांच्या मधील अंधश्रध्दा बद्दलचे विचार संपूर्ण नष्ट करण्याची गरज आहे. अंधश्रद्धा बाळगने या वर विशेष प्रावधान असले पहिजे. समाजाची विशेषता ग्रामीण विभागातील अंधश्रद्धा बद्दलच्या परंपरा नष्ट करण्याची गरज आहे, असे त्याची उदभोधन केले.
अंधश्रद्धा वरती काही प्रात्येक्षिके करुण दाखवली, तसेच काही ढोंगी बाबा प्रयोग करुण जनतेला लुभाळतात व अंधश्रद्धा पसरवतात, असा त्याचा एक प्रकारचा व्यवसाय बनलेला आहे आणि म्हणून प्रात्येकक्षीका अति अंधश्रद्धेला जनता कशी बळी पडते यावर मंथन केले. मंचावर त्यांचेच सहकारी चंद्रकांत झटाले यांनी सुद्धा अंधश्रद्धा वरती उदभोधदन केले व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. सोबत दुसऱ्या सत्रामध्ये अकोल्यावरुण खास करुण आयुर्वेद तज्ञ डॉ, शुभम माळी व डॉ अश्विन इंगळे यांनी गुदविकार व उपाय योजना यावर मोलाचे मार्गदर्शन केले. समाजामध्ये गुप्तविकार असलेले रुग्ण सहसा योग्य वेळी उपचार घेत नसल्यामुळे गुप्तरोगाची लक्षणे दिवसेंदिवस वाढत जातात. गुदविकाराच्या रुग्णांनी कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता वेळीच तज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करने अपेक्षित असते. पूढे बोलतांना त्यांनी आयुर्वेदाचे विविध उपचार पद्धति बद्दल माहिती दिली, व काही रूग्णांंची तपासणी केली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडनण्यासाठी रा. से. यो चे कार्यक्रम अधिकारी डॉ.व्ही. एस. उंडाळ, डॉ.व्ही. बी. कोटंबे तथा डॉ. एम आर अहीर व उपस्थित रा. से. यो चे विद्यार्थ्यी चैतन्य इंगळे, सागर पवार,सर्वज्ञा सुकळकर,साक्षी घुले व इतर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन रासयो ची गायत्री आव्हाळे हिने, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऋषिकेश चव्हाण यांनी केले .
Comments
Post a Comment