बार्शिटाकळी येथे जागतिक क्षयरोग दिवस साजरा......
बार्शिटाकळी येथे जागतिक क्षयरोग दिवस साजरा......
बार्शिटाकळी : २४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय बार्शिटाकळी व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बार्शिटाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय बार्शिटाकळी येथे क्षयरोग दिवस साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीष शर्मा, डॉ भावना हाडोळे, डॉ महेश राठोड, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रूग्णालय बार्शिटाकळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाला फनाह -ए -आम ट्रस्ट महाराष्ट्र बार्शिटाकळी शहराचे अध्यक्ष डॉ. मुदश्शीर खान, हुशेन खान,हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच रूग्ण कल्याण सदस्य मो. सादिक लीडर, भा.ज.पा. महिला शहर अध्यक्षा तथा रूग्ण कल्याण समिती सदस्य श्रीमती पुष्पाताई रत्नपारखी, महेफुज खान. याची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अमोल पाचाडे, शिराज खान, यांनी केले तर सुत्रसंचलन प्रभाकर तिडके यांनी केले. या कार्यक्रमासााठी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व फनाह ए आम ट्रस्ट बार्शिटाकळी, युथविंग जमात ए इस्लामिक हिंद बार्शिटाकळीचे अध्यक्ष डॉ मुदश्शीर खान व सदस्य यांनी सहभाग घेतला होता
उपस्थितांना डॉ मनीष शर्मा व डॉ मुदश्शीर खान यांनी क्षयरोगाबाबत मार्गदर्शन केले त्यामध्ये निश्चय दिवस, निश्चय मित्र बनुन गरजु क्षयरोग रूग्णांना 6 महिन्याकरिता दत्तक घेतले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले
Comments
Post a Comment