व्हाट्सअप च्या माध्यमातून गरीब मुलीचा उपचाराला मदत करण्यासाठी सरसावले शेकडो हात.....
व्हाट्सअप च्या माध्यमातून गरीब मुलीचा उपचाराला मदत करण्यासाठी सरसावले शेकडो हात....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील खेर्डा खुर्द या छोट्याशा गावातील लहान मुलगी कु. गोपी विजय राऊत ही छोटीशी दहा वर्षाची मुलगी इयत्ता चौथ्या वर्गामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खेर्डा खुर्द येथे शिकणारी मुलगी ग्रामपंचायत च्या परिसरात शाळेच्या व ग्रामपंचायतच्या परिसरात खेळत होती. तिथे बांधकाम सुरू असल्याने तिथे असलेले बसण्यासाठीचे सिमेंट बेंच उलटे करून ठेवले होते. त्यातील एक सिमेंट बेंच कोणीतरी सरळ करून त्याच्यावर बसण्याचा प्रयत्न केला असेल तो तसाच ठेवून दिला. आणि कु. गोपी त्याच सिमेंट बेंच वर खेळत होती. मग ती त्या सिमेंट बेंच च्या मागून जाऊन खेळू लागली खेळता खेळता ती त्या सिमेंट बेंच ला मागून लटकली आणि जशी लटकली तसेच तो सिमेंट बेंच तिच्या तोंडावरती आदळला. त्यात कु. गोपी ही गंभीर जखमी झाली.
तिची नाक व तोंड दबल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने तिच्याकडे धाव घेऊन सिमेंट रपटा उचलण्याचा प्रयत्न केला. सिमेंट रपटा भारी असल्याने तो सहजासहजी उचलल्या जात नव्हता, कसं बसे लोकांनी सिमेंट रपटा उचलून तिची सुटका केली. सिमेंट रपटा उचलल्यानंतर कु. गोपी विजय राऊत चे नाक, तोंड डोळे व दात ह्या सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात इजा झाली. अशा वेळी गावातील *मा. संदीप लक्ष्मणराव चौधरी (उपसभापती) पंचायत समिती बार्शीटाकळी हे खेर्डा खुर्द मध्ये त्यांचं गाव असल्याने गावातच होते.*
त्यांनी तातडीने कु. गोपीला ग्रामपंचायतच्या स्कूल व्हॅनमध्ये उचलून तातडीने आयकॉन हॉस्पिटल गाठले, हॉस्पिटल गाठले खरी पण जवळ एक पैसाही नव्हता. काय करावे संदीप चौधरी यांनी मित्रांना फोन करून कसेबसे भरती करून दिले. आणि प्रश्न पडला तो पुढील होणाऱ्या उपचारासाठी पैशाचा, डॉक्टरांनी जवळपास पाच लाख रुपये खर्च सांगितल्याने त्यांची धांदल उडाली. अशातच काय कराव त्यांना सुचत नव्हते मग त्यांना एक आयडीया आली की आपण कु. गोपी चे फोटो काढून थोडा मॅसेज तयार करून तो व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करावा. गावातील तरुण युवक नयन गावंडे यांनी कु. गोपी ला मदत करण्याचा आव्हान मॅसेज तयार करून तो मित्रांना पाठवला वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुप वरती मेसेज येऊ लागला
कु. गोपी चे अपघातग्रस्त फोटो आणि मदतीच्या आशयाचा मॅसेज गावातील नयन गावंडे यांनी तयार करून तो मित्र मंडळी ना वाटशप वर शेअर केला. बघता बघता मदतीचा ओघ सुरू झाला की शेकडो लोकांनी फोन करून कु. गोपी विजय राऊत च्या इलाज करण्यासाठी शंभर रुपयापासून ते 5,000 रुपयांपर्यंत ची मदत केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास दोन ते अडीच लाख रुपये जमा झाले. लोक पैसे देण्यासाठी फोन करत होते, प्रसंगच तसा कठीण होता आणि याच्यासाठी विशेष प्रयत्न घेतले ते मा. संदीप लक्ष्मणराव चौधरी (उपसभापती) पंचायत समिती बार्शीटाकळी एडो. महेश घनगाव (सामाजिक कार्यकर्ते) पिंजर संघपाल अरुण वाहूरवाघ पानी फाउंडेशन तालुका समन्वयक बार्शीटाकळी, वैभव पाठे (भाजपा सोशल मीडिया प्रमूख) अकोला जिल्हा व इतरही मित्र मंडळ नातेवाईक महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे विभागाचे कर्मचारी यांनी गोपीला भरभरून मदत केली.
आयकॉन हॉस्पिटल मधून तिला आता रावणकर हॉस्पिटल येथे भरती करण्यात आलेला आहे. तरुण तडफदार व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीचे ऑपरेशन होणार असून डॉ. अमोल रावणकर सर यांनीही इतरही डॉक्टरांना बोलावून कु. गोपी वर विशेष लक्ष ठेवून तिची काळजी घेत आहेत. आतापर्यंत
विशेष मदत मा. हरिष भाऊ पिंपळे आमदार साहेब मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघ, पानी फाऊंडेशन टिम महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक अधिकारी कर्मचारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, पंचायत समिती सदस्य व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, उमेद अभियान च्या ICRP, सरपंच, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनी भरभरून सहकार्य केले. डॉक्टरानी 5 लाख रुपये खर्च सांगितले असून आतापर्यंत सोशल मीडियावरून आव्हान केल्यावर 2.5 लाख जमा झाले आहेत. अजूनही मदतीची अपेक्षा आहे.आपल्याला, विनंती आहे की आपल्या परीने शक्य होईल तेवढी आर्थिक मदत या गरीब कुटुंबाला करावी. गोपी चे वडील गावात टेलर्स असून आई शेतात लोकांच्या शेतात हात मजुरी करून उदरनिर्वाह करतात. आपण मदत करावी जेणे करून कु. गोपी विजय राऊत या गरीब गरजू मुलीचा इलाज करता येईल. खालील नंबर वर आपण मदत फोन पे नी करू शकता.
आकाश लक्ष्मण राऊत
PHONE PAY -7875409767
AC-NO - 31938457881
BANK - SBI main branch, akola
IFSC CODE -SBIN0000306
Comments
Post a Comment