∆पातूर येथे लोकल थीमवर आधारित एक दिवसीय कार्यशाळा संपन्न...... ∆नेहरू युवा केंद्र व साने गुरुजी मंडळ पातूर द्वारे आयोजन......

∆पातूर येथे लोकल थीमवर आधारित एक दिवसीय कार्यशाळा संपन्न......

∆नेहरू युवा केंद्र व साने गुरुजी मंडळ पातूर द्वारे आयोजन......
बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )
              युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार नेहरू युवा केंद्र,अकोला संलग्नित साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ,पातूर व स्वामी विवेकानंद युवती मंडळ,पातूर तसेच स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण,पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकल थीम आधारित एक दिवसीय कार्यशाळा ही दि.०४ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ ते ०५ वाजे पर्यंत नगर परिषद कार्यालय सभागृह, पातूर येथे आयोजित करण्यात आली होती.
         यावेळी कार्यशाळेचे उदघाटक पातूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हरिष गवळी यांचा हस्ते कार्यशाळेची सुरवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आळी. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक व ठाणेदार हरिष गवळी यांनी कार्यशाळेतील युवांना मार्गदर्शन केले व प्रमुख पाहुणे अ.कुद्दुस शेख यांनी युवकांना व कार्यशाळेला शुभेच्छा देऊन भाषण कौशल्य व सभाधिटपणा या विषयावर प्रा.निलेश पाकदूने तर व्यक्ती महत्व विकास अँड.योगेश नागपुरे व्यसनमुक्तीबाबत अमरदिपभाऊ सदांशिव, वेळचे व्यवस्थापनबाबत निलेशभाऊ गाडगे, झिरो बजेट उपक्रम व एन.जी.ओ. अनुदान बाबा युवाश्री विशाल राखोंडे तर सामाजिक खेळ गजानन आवटे व शासकीय पत्र लिखान व योजनाबाबत सागर राखोंडे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी मंडळाकडून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत वृक्ष व नामगौरव, कार्यशाळेची किट व माहिती पुस्तिका कापडी पिशवी देऊन करण्यात आले तसेच एन.सी.सी मधून आर.डी.सी परेड दिल्ली येथे सहभागी होणारा पातूर येथील जय सुहास देवकर व मिडीया न्यूजचे युवा पत्रकार नाजीमुद्दीन शेख तसेच जिल्हा युवा मंडळ पुरस्कार प्राप्त प्रवीण वाहूरवाघ यांचा मान्यवरांच्या हस्ते वृक्ष व नामगौरव देऊन सत्कार करण्यात आला. कार्यशाळेतील युवकांना विविध प्रेरणादायी चित्रफीत सुध्दा दाखविण्यात आल्या आणि विविध खेळाच्या माध्यमातून त्यांना समूह कार्य व युवा आणि ग्राम विकासा व महिला सक्षमीकरण बाबत माहिती दिली त्याच बरोबर कार्यशाळेतील सर्व सहभागी झालेल्या युवांना प्रशिक्षन किट देण्यात आली . त्यामध्ये नोटबुक, पेन, माहिती पत्रक, अल्पोहार व कापडी पिशवी देऊन भोजन देण्यात आले तसेच यावेळी जिल्ह्यातून १२८ युवकांनी कार्यशाळेत सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडळाचे अध्यक्ष सागर राखोंडे यांनी करुन सूत्रसंचालन ओम राखोंडे तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पल्लवी मांडवगणे (राखोंडे) यांनी केले. यावेळी कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व युवांना प्रमाणपत्र वितरित करुन व्यसनमुक्ती व पाणीबाबात प्रतिज्ञा देऊन व कार्यशाळेची सांगता ही राष्ट्रवंदनेने करण्यात आली . यावेळी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ने.यु.केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक नारायण ठाकरे, हरिओम राखोंडे, विकास जाधव, नम्रता आठवले, राधा खंडारे व मंडळाचे पदाधिकारी श्याम उगले, महेश निंबोळे, सागर पदमने, प्रज्वल भाजीपले, गणेश देवकर, सुहास देवकर, अतुल भांगे, प्रज्वल इंगळे, पार्थ बेहरे, शुभांगी उमाळे, ज्योती राखोंडे यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे