प्रा. भाऊसाहेब गायकवाड उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्काराने सन्मानित.....
प्रा. भाऊसाहेब गायकवाड उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्काराने सन्मानित.....
बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला उपक्रम करिअर कट्टा या अंतर्गत उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार स्थानिक गुलाम नबी आझाद कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी जिल्हा अकोला महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि करिअर कट्टाचे जिल्हा समन्वयक प्रा. भाऊसाहेब गायकवाड यांना सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एन. राजशेखर पिलाई, सचिव लेफ्टनंट जनरल जगवीर सिंग, केंद्रशासन पावर सेक्टर स्किल सेंटरचे सचिव प्रफुल्ल पाठक, कौशल्य आणि उद्योजक विकासचे सहसचिव नामदेव भोसले, के .जी. सोमय्या महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रज्ञा प्रभुणे आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नुकतेच के. जे. सोमय्या मुंबई येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. करिअर कट्टा अंतर्गत आय.ए.एस. आपल्या भेटीला, उद्योजक आपला भेटीला आणि विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम गेल्या वर्षभरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले. यासाठी जिल्हा पातळीवर महाविद्यालयीन समन्वयकांशी समन्वय साधण्यासाठी कार्यरत महाराष्ट्रातील जिल्हा समन्वयकांनी वर्षभर केलेल्या कार्याबद्दल उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले जाते. अकोला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षा तयारी आणि महत्त्व तसेच उद्योजकतेसाठी असणारे उपक्रम महाविद्यालयीन समन्वयकाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य जिल्हा समन्वयक म्हणून प्रा. भाऊसाहेब गायकवाड यांनी जिल्ह्यामध्ये केले आहे. यासाठी त्यांना महाविद्यालयीन, प्राचार्य, समन्वयक, त्याचबरोबर तालुका समन्वयक यांनी सहकार्य केले आहे. यांच्या या यशाबद्दल प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ, जनुना ता. बार्शीटाकळी अध्यक्ष तथा गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी जिल्हा अकोला प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार, उपराचार्य डॉ. आर. आर. राठोड, उपप्राचार्य डॉ. अमित वैराळे, कार्यालय अधीक्षक नंदकुमार राऊत, डॉ. संतोष हुसे, प्रा. आदित्य पवार, डॉ. अनिल दडमळ, प्रा. सुधीर राऊत, डॉ. धनंजय खिराडे, डॉ. संजय देशमुख, डॉ. संतोष सुरडकर, डॉ.सिद्धार्थ वाघमारे, डॉ. पी.एन. राठोड , प्रा. प्रमोद तसरे , प्रा. युवराज काळे, डॉ. भीमराव जैवळ , दत्ता शास्त्री, डॉ.पी.एन. राठोड, डॉ. अनंत कुटे, डॉ. सतीश खोब्रागडे, डॉ. विनोद उंडाळ, डॉ. मनिष आहीर,प्रा. तेजस पाटील, प्रा. संजय चव्हाण, प्रा. बोराडे मॅडम, डॉ. अरुण उमाळे, डॉ.दीपक चौरपगार, डॉ. कैलास काळे, रोहिदास आडे, डॉ. मनोज जाधव, डॉ. पी.डी. देशमुख, डॉ. कैलास नागुलकर, डॉ. बल्लाळ , डॉ. शरद इधोळे, डॉ. राजू सरकटे, डॉ. अनंत कुटे, डॉ. श्रीराव, प्रा. यशवंत जयसिंगपूरे ,प्रा. नीलिमा कंकाळे , शांताराम जाधव, प्रा. नीता पांडे, डॉ. प्रियांका मसतकर, रवींद्र भटकर, अब्दुल मतीन , मुफिज खान, महाविद्यालयातील प्राध्यापक रुंद व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment