अकोला येथे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न....
अकोला येथे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न....
बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )
नेहरू युवा केंद्र अकोला आणि नेहरू युवा मंडल शिलोडा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक वसंत देसाई स्टेडियम येथे दि. 1/3/2023 रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत युवकांसाठी कबड्डी, व्हॉलीबॉल व कबड्डी, तरूणांसाठी 100 धावणे व लांब उडी स्पर्धा घेण्यात आल्या. प्रमुख पाहुणे म्हणून अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा युवा अधिकारी महेशजी शेखावत यांच्यासह नेहरू युवा मंडळ शिलोडा च्या अध्यक्षा नाजिया खान उपस्थित होत्या. 18 ते 29 वयोगटातील युवकांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विजेत्या संघटनेला ट्राफी व प्रमाणपत्र, तसेच धावणे, लांब उडीतील विजेत्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.पवन देशमुख, निशांत वानखडे, अश्विन शिरसाट, यज्ञेश अकोटकर, स्वराज मिरजे, अभिजीत गोमस, विकी पवार, सागर गवई,
अभिजित भारसाकळे, लक्ष्मीकांत उगवेकर गजानन चट्टे, यांनी पंचाची भूमिका निभावली . स्पर्धेला यशस्वी करण्या साठी नम्रता आठवले, सागर राखोडे, राधा, नितीन,राजू उग्वेकार,अमर भटकर,फरीद खान,मोइन खान मिसब खान आदिनी परिश्रम घेतले .
Comments
Post a Comment