∆महान बार्शीटाकळी मार्गावरील पुलाला पडले मोठे भगदाड...... ∆जीवित हानी होण्याची शक्यता......
∆महान बार्शीटाकळी मार्गावरील पुलाला पडले मोठे भगदाड......
∆जीवित हानी होण्याची शक्यता......
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : पिंजर महान मार्गे तिवसा दगडपारवा या मार्गांवरील पुलाला मोठे भगदाड पडले असुन पुलाच्या खालील भागाला किनार पडली आहे . सदर किनार येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना अजिबात दिसत नाही . याच ठिकाणी यापूर्वी अनेक वेळा अपघात झालेले आहेत .हे अपघात ग्रस्त ठिकाणी असून या ठिकाणच्या पुलाची लवकर दुरुस्ती करावी तसेच पुलाला कठडे बसवावे, अन्यथा येथे केव्हाही जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. अपघात होऊन जिवीत हानी झाल्यास या बाबीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील,असा इशारा नागरिकांनी दिला आहे. पिंजर महान मार्गे तिवसा हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडला असून अतिशय वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गावर रात्री बे रात्री सुध्दा मोठ्या संख्येने वाहने धावतात. सद्या त्या पुलाला भगदाड पडल्याने त्या ठिकाणी कधी जिवीत हानी होईल,हे सांगता येणार नाही. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी झोप उघडून आधी त्या पुलाची दुरुस्ती करावी,अन्यथा या ठिकाणी जिवीत हानी झाल्यास त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा नागरिकांनी दिला आहे....
Comments
Post a Comment