केंद्रीय स्तरीय अधिकारी महेंद्र भगत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते सन्मानित.....

केंद्रीय स्तरीय अधिकारी महेंद्र भगत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते सन्मानित......

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी तालुक्यातील टिटवा नवीन जिल्हा परिषद शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक व विषय शिक्षक महेंद्र भगत हे नुकताच अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते सन्मानित झाले आहे बार्शिटाकळी तालुक्यात केंद्रीय स्तरीये अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महेंद्र भगत यांना अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे
केंद्रस्तरीय अधिकारी महेंद्र भगत यांनी अकोला जिल्ह्य़ातून टिटवा नवीन येथील प्रथम शंभर टक्के काम पुर्ण केले असून निवडणूक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून बार्शीटाकळी तालुक्याचे नाव उज्वल केले आहे त्यामध्ये मतदारांचे आधार कार्ड अपडेट नवीन मतदार नोंदणी व इत्यादि सर्व कार्य त्यांनी यशस्वी रित्या पूर्ण केले आहे बार्शीटाकळी चे निवडणूक नायब तहसीलदार शिवहरी थेंबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवडणूक लिपिक सांगळे अनिल चहाकर यांच्या सहकार्याने त्यांनी सदर कार्य यशस्वीरिते पूर्ण केले आहे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते सन्मानित झाल्याबद्दल सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे जिल्हा अध्यक्ष व डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांनी त्यांचे संपूर्ण संघटनाच्या वतीने त्यांचे अभिनंदन व कार्याचे कौतुक केले आहे शिक्षक महेंद्र भगत हे कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकले की त्याला यशस्वी करण्याची जिद्द ठेवतात आणि त्याच जिद्दीच्या बळावर सदर कामाला यशस्वी करतात शिक्षण क्षेत्रात सुद्धा त्यांची मोठी कामगिरी असून त्यांनी आपल्या माध्यमातून शिक्षकांसह विद्यार्थ्यांची विविध प्रश्न सोडविले आहे त्यांचे मुख्याध्यापकांचे कार्यकाळात शाळेला मोठ्या प्रमाणात क्रीडा साहित्य मिळून देण्यात सुद्धा त्यांचा मोठा यश आहे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत असून 21 महेल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राहुलला खान मुख्यध्यापक प्रकाश राठोड
मुजीब बेग जहिदुर रहमान अदिनी त्यांचे अभिनंदन केले आहे 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे