भेंडी महाल येथे गुलाम नबी आझाद महाविद्यालयात श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.....
भेंडी महाल येथे गुलाम नबी आझाद महाविद्यालयात श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.....
बार्शिटाकळी : स्थानिक बार्शिटाकळी येथील गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शीटाकळी च्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचा समारोपिय कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. संपूर्ण सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.आर. पवार यांच्या मार्गदर्शनात भिंडीमहल येथे पार पाडला. शिबिराच्या शेवटच्या दिवशी लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ. आर आर राठोड़ तथा मुख्य अतिथि गांवचे प्रथम नागरिक सरपंच श्री. संदीपजी राठोड़, सोबतच रासयो चे जिल्हा समन्वयक प्रा.रतनलाल येउल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची रूपरेखा आखण्यात आली. गांवचे उपसरपंच श्री. दिनेशभाऊ है सुध्दा कार्यक्रमाला उपस्थित होते. संत शिरोमणी
सेवालाल महाराज मंदिर प्रांगणात कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात अयोजन करण्यायात आले. संत गाडगेबाबाच्या प्रतिमेचे दीप प्रज्ज्वलन व पुष्प अर्पण केल्यानंतर प्रास्ताविक भाषना मध्ये रासेयो चे कार्यक्रम अधिकारी तथा श्रमसंस्कार शिबिराचे आयोजक डॉ. व्ही एस उंडाळ यानी संपूर्ण शिबिराची माहिती दिली, तथा मुख्य पाहुन्यांची ओळख करुण दिली. सात दिवसीय निवासी शिबिरामध्ये
राबविलेले विविध उपक्रम व शिबिरादरम्यान आलेल्या काही समस्या व इतर माहिती दिली. गावचे सरपंच श्री संदीपजी राठोड यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. पुढे शिबिरार्थिंनी गावातील केलेले उपक्रम व इतर योगदान नक्कीच प्रंशसनीय आहे व ते गावकऱ्यांन साठी प्रोत्साहन देतील असे प्रतिपादन केले. रासेयो च्या विद्यार्थींना मार्गदर्शन करत असतांना जिल्हा समन्वयक प्रा.रतनलाल येउल यांनी शिबीर खेडेगावामध्ये घेण्यामागची भुमिका विशद केली. विद्यार्थ्यांना चांगले संस्कार घडावे, स्टेजवर येऊन प्रत्येकांनी संवाद कौशल्य वाढवावे व स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा असे प्रतिपादन केले. खेड्यातील जीवनचक्राचा विद्यार्थ्यांना जवळून अभ्यास व्हावा, श्रमदानाला, कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने शिबिराचे जीवनामध्ये खुप महत्त्व आहे असा संदेश दिला. राष्ट्रसंतांचे विचार समजून घ्या व ते हळूहळू आचरणात आणण्याचा प्रयत्न करा, बरेच समर्पक उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांचे मार्गदर्शनातून निराकरण करण्याचा प्रयत्न केला. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणांमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा वरिष्ठ प्रा डॉ आर आर राठोड यांनी शिबीरादरामधे पार पडलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली, व रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डॉ व्ही एस उंडाळ यांचे कौतुक केले. शिबीरार्थींनीनी यशस्वीपणे सर्व उपक्रम सुरळीत पार पाडल्याबद्दल त्यांचे सुद्धा मनःपूर्वक आभार व्यक्त केले. गावकरी मंडळी व गावाचे पदाधिकारी यांनी शिबिरार्थींना मोलाचे सहकार्य केल्याशिवाय शिबिर यशस्वीरित्या पार पाडू शकले नसते, म्हणून गावकऱ्यांना सुद्धा त्यांनी धन्यवाद दिले. जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल, संस्कार शिकायचे असतील तर अशा शिबिराचे समाजात विशेष महत्त्व आहे, असा उपदेश दिला. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले व भावनिक शब्दांमध्ये रासेयो च्या सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले, तथा गावकऱ्यांनी सर्वच शिबिरार्थींना व एकमेकांना मदत केली म्हणून कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवली नाही, असे उदघार काढले. या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा, यशस्वी आयोजन करण्यासाठी रासेयो चे प्रा डॉ व्ही एस उंडाळ, प्रा डॉ. व्ही. बी. कोटंबे तथा प्रा डॉ एम आर अहिर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री आव्हाळे तर आभार प्रदर्शन ऋषिकेश चव्हाण यांनी केले.
Comments
Post a Comment