वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली आंदोलकांची भेट !!

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली आंदोलकांची भेट !! 
अकोला : जुनी पेंशन योजना लागू करावी म्हणून राज्यात गत तीन दिवसापासून सुरू असलेल्या अकोल्यातील आंदोलनात सहभागी होऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा व्यक्त करत आंदोलकांचे मनोधैर्य वाढविले. सत्ता आली तर आम्ही जुनी पेंशन योजना पुर्ववत लागू करू असा शब्द बाळासाहेब आंबेडकरांनी यापुर्वीच दिला आहे. केवळ शाब्दिक पाठिंबा नाही तर कृतीतून त्यांनी दाखवून दिले की, कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असून वंचित बहुजन आघाडी आंदोलनकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

सत्तेत असले की, अनेक कारणे दाखवून प्रश्न न सोडवता प्रश्नाला बगल द्यायची,कर्मचारी असो वा शेतकरी, शेतमजूर, कामगार असो त्यांना न्याय द्यायचा नाही. मात्र सत्तेबाहेर फकले गेले की आपली पुर्वीची भूमिका बदलवून विरोधी पक्षात असताना तोंड फाटेस्तोर भूमिकेचे समर्थन करणारे आजी माजी सत्ताधारी जेंव्हा बोंबलतात तेंव्हा दोघांच्याही भूमिकेची किव करणेच आपल्या हातात नसते तर सत्तेत बदल घडवून आपल्या हक्काचे रक्षण करणारी व्यक्ती आपण सत्तेत बसवली पाहिजे. मात्र दुर्दैवाने मतदान केंद्रावर मतदानासाठी जाताना बहुतांश मतदार हा स्वतः सोबत जात घेऊन जात असल्याने तो आपल्या जातीच्या उमेदवाराला मतदान करतो.पर्यायाने तो स्वतःची कबर स्वतःच खोदत असतो.काम करणाऱी अभ्यासू व्यक्ती, पक्ष यांना टाळल्यामुळे सरंजामशाहीचे फावते हे मात्र सत्य आहे. बाळासाहेब आंबेडकरांना निवडून द्या, अनेक प्रश्न मार्गी निश्चित लागतील एवढे मात्र निश्चित. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे