वंचित बहुजन आघाडीची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवा - अंजलीताई आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवा - अंजलीताई आंबेडकर
पुणे - वंचित बहुजन आघाडीची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवा असे प्रतिपादन अंजलीताई आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडी पुणे शहर समन्वयक बैठक अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 मार्च 2023 रोजी पुण्यात पार पडली. वंचित बहूजन आघाडी पुणे शहर, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी, वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या सर्व पदाधिकारी यांची समन्वयक बैठक झाली.
यावेळी अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, पदाधिकारी हा पक्षापेक्षा मोठा नसतो, हे सांगताना वंचित बहुजन आघाडीच्या ध्येय धोरणेनुसार संघटक वाढवण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी एकमेकांना विचारात घेऊन संवाद साधला पाहिजे. तसेच पदाधिकारी यांचा सोशल मिडिया हा व्यक्तीगत नसुन पक्षाची भूमिका समोर ठेऊन पोस्ट कराव्यात अशा सुचना केल्या.
बैठकीत युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील, पुणे शहर अध्यक्ष मुनव्वर भाई कुरेशी, महिला आघाडी महासचिव ॲड रेखाताई चौरे, युवक आघाडी अध्यक्ष परेश शिरसंगे, माथाडी कामगार अध्यक्ष प्रशांत कसबे, पुणे शहर महासचिव ॲड अरविंद तायडे, सुनिल धेंडे यांच्यासह पुणे शहरातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment