राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या विभागीय बैठकीचे आयोजन...
राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या विभागीय बैठकीचे आयोजन...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
राजीव गांधी पंचायत राज संघटना (AICC) ची विभागीय बैठक दिनांक 12/4/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता स्वराज भवन अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेला अ. भा. काँग्रेस कमिटी सचिव मा. श्री. सचिनजी नाईक , राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे प्रदेश प्रभारी नारायणसिंह राठौड , प्रदेशाध्यक्ष संजयजी ठाकरे व जिल्ह्या मधील वरीष्ठ कॅाग्रेस नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी आपण सर्व पंचायत राज व्यवस्थेमधील आजी , माजी पदाधिकारी, नगर अध्यक्ष, नगर सेवक, सरपंच, ग्रा. पंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी सदर बैठकिला उपस्थित रहावे असे आवाहन राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आलमगीर खान यांनी केले आहे.
Comments
Post a Comment