महान केंद्राच्या वतीने केंद्र स्तरीय शिक्षण परिषद संपन्न...

महान केंद्राच्या वतीने केंद्र स्तरीय शिक्षण परिषद संपन्न.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी:- शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शिटाकळी अंतर्गत बार्शिटाकळी तालुक्यातील महान केन्द्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा टिटवा नवीन येथे मंगळवारी आयोजित करण्यात आले होते सदर शिक्षण परिषद बार्शिटाकळी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रतनसिंग पवार व शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख विनोद गणपत पिंपळकर यांनी आयोजित केली होती यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष महान केंद्राचे केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून उच्च श्रेणी मुख्याध्यापक शफीक अहमद खान राही उच्च श्रेणी मुख्याध्यापक सुशीला महाकाळ, डॉ शाहिद इक्बाल खान , सुलभक शिवशंकर आस्वार , श्री संदीप पालवे , महेंद्र भगत , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय लोखंडे यांची प्रमुख्याने उपस्थिती होती यावेळी उपस्थित केंद्रातील सर्व शिक्षकांना निपुण भारत अध्ययन स्तर सर्वेक्षण विश्लेषण जॉलीफोनिक बाबत सविस्तर मार्गदर्शन व जॉली फोनिक तासिकाचे सादरीकरण अध्ययन निष्पत्ती संकल्पना नास सर्वेक्षण मूलभूत कोडींग प्रशिक्षण संबंधी संपूर्ण माहितीचे सादरीकरण उपस्थित शिक्षकांना करण्यात आले यावेळी शिक्षकांकडून प्रथम व शिक्षण परिषदेनंतर चाचणी ही सोडून घेण्यात आली यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला च्या वतीने सुरू करण्यात येणारे शिक्षकांसाठी लाभदायक व 21 व्या शतकातील महत्त्वपूर्ण असा समजला जाणारा मूलभूत कोडींग प्रशिक्षण बाबत केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच जवली फोनिक या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणारे शाळेतील शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक मोहन देविदास तराळे मुख्याध्यापक प्रकाश राठोड मुख्याध्यापक विजय टपके मुख्याध्यापक जाहे दूर रहमान खान राजेंद्र नवलकर बंडू भगत शिवशंकर आस्वार अब्दुल खालिक सैफुद्दीन तेजराव बिलेवार मनीषा सूर्यवंशी मायावती खिराडे शंकर बळीराम पिलात्रे राहत बनो शब्बीर खान अश्विनी सरोदे शिवराज बोचरे अब्दुल कदीर खान नदीम खान मोहम्मद सज्जाद शगुप्ता जमाल रुबीना शाह गुल ए राणा नामदेव देवकते दत्तकुमार चव्हाण संतोष डाबेराव एच बी राठोड उज्वला सरनाईक निलांगी राजेंद्र देशमुख स्वाती नालींदे सुरेखा भोपळे रूपाली वारकरी पुष्पा डाबेराव पूजा बाहकार अविनाश जंजाळ व्ही पी देशमुख जी आर गोतरकर रिजवान अहमद अनीस अहमद मुशरीफ अहमद सय्यद नाझीम रईस अहमद सय्यद सादिक अली मोहम्मद अजीम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी केंद्रातील मोठ्या प्रमाणात शिक्षकांची उपस्थिती होती सदर शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी बार्शीटाकळी पंचायत समिती साधन केंद्राचे उज्वला बनाइत व वृषाली सोनार यांनी परिश्रम घेतले 
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन टिटवा नवीन जिल्हा परिषद शाळे चे मुख्याध्यापिका सुशीला महाकाळ यांनी केले

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे