गुलाम नबी आझाद महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....
गुलाम नबी आझाद महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी
स्थानीक बार्शीटाकळी येथील प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना, द्वारा संचालित गुलाब नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शीटाकळी जि. अकोला, येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत, महाविद्यालयामध्ये विश्वरत्न, महामानव, भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली व विनम्र अभिवादन करण्यात आले. जयंती कार्यक्रम प्राचार्य डाॅ. एम आर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. अभिवादन करण्यासाठी सुरुवातीला दीपप्रज्वलन करून
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अनेक जाती, विविध धर्म, विविध पंथ, अनेक भाषा, अनेक संस्कृती, अनेक चालीरीती, भिन्न खानपान असलेल्या वैविध्यपूर्ण भारताला संविधानाच्या माध्यमातून एक सूत्रात गुंफून सर्वांना स्वातंत्र्य, समानता, न्याय व लोकशाहीचे हक्क -अधिकार बहाल करून, बलशाली, समृद्ध शाली, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या राष्ट्राची निर्मिती करणारे संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित् त्रिवार विनम्र अभिवादन करण्यात आले. जयंती साजरी करण्यासाठी महाविद्यालयाचे डॉ मनीष अहीर, श्री पंजाब जाधव, नामदेवराव राठोड (मामा), चैतन्य इंगळे, अंकुश, सिमा धनगावकर व इतर उपस्थित होते. संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डॉ व्ही एस उंडाळ व डॉ व्ही बी कोटंबे सोबतच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment