मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह बार्शिटाकळी येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन......
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह बार्शिटाकळी येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शीटाकळी : मा.आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय म.रा. पुणे- यांचे परीपत्रक क्रं १५ दि. ३० मार्च २३अन्वये दि.१ ऐप्रील २३ ते दि.१ मे २३ या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्याचे आदेशीत केल्यानुसार ,सामाजीक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येत असलेले ,मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह बार्शिटाकळी जि. अकोला या वसतीगृहात डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती निमीत्त दि. १ ऐप्रील २३ ते दि.१ मे २३ पर्यन्त ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा / निबंध स्पर्धा / पथनाटय तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमीत्त व्याख्यानपर कार्यक्रम / आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करणे इत्यादी प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतीमेचे प्रथम पूजन करुन जागातीक आरोग्य दिनानिमीत्त दि.७ ऐप्रील २३ रोजी , वसतीगृहामध्ये आरोग्य तपासणीचे शिबीर घेण्यात आले असून ,विदयार्थ्याच्या व कर्मचा-याच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. सदर शिबीरा करीता डॉ. मनीष सेन व डॉ. इंगोले यांनी परीश्रम घेतले.
क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमीत्त दि.११ ऐप्रील रोजी जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला
सौ.सुनंदाताई मानतकार ( सभापती पं.स.बार्शिटाकळी)
. गजाननभाऊ मानतकर,संजय वाट (जेष्ठ पत्रकार),श्यामभाऊ ठक (तालुका अध्यक्ष पत्रकार संघ)
बाळकृष्ण घनगाव (प्राचार्य) या सर्व मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आलेले होते.पाहुण्याच्या उपस्थितीत क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतीमेचे प्रथम पूजन करण्यात आले .नंतर पाहुण्याचे स्वागत करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.वसतीगृहातील विदयार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या कार्यालबददल भाषणे दिली. गजाननभाऊ मानतकार यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये महाथोर पुरुषाबाबत माहीती देऊन शिक्षणाचे महत्व समजावून सांगीतले. संजयजी वाट (जेष्ठ पत्रकार) श्यामभाऊ ठक (तालुका अध्यक्ष पत्रकार संघ)यांनी विदयाथ्र्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या .तसेच बाळकृष्ण धनगाव (प्राचार्य) यांनी, त्यांच्या व्याख्यानातुन शिक्षणाची महती समजाऊन सांगीतली . कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुनंदाताई मानतकर (सभापती) यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले . कार्यकमाचे आभारप्रदर्शन गृहपाल के. एम. तिडके यांनी केले .. सदर कार्यक्रमासाठी राहूल इंगोले सामाजीक कार्यकर्ते, वसतीगृहातील कर्मचारी जी. एन. राठोड कनिष्ठ लिपीक,राजेश चव्हाण चौकीदार,परमेश्वर जाधव, पवन खंडारे , विजय खंडारे संदीप इंगळे यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment