गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागांची वंचित बहुजन आघाडी ने केली पाहणी......
गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागांची वंचित बहुजन आघाडी ने केली पाहणी......
बार्शीटाकळी तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. यामध्ये कांदा, काकडी,टरबूज,भूईमूग यासारख्या बऱ्याच पिकांचं नुकसान दिसून येत आहे. तालुक्यातील जांब या गावांमध्ये वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी टीम गेली असता. गणेश कनीराम चव्हाण यांचे दोन एकर टरबूज, आणि माणिक कनीराम चव्हाण यांचे दोन एकर काकडी या पिकांचे प्रचंड नुकसान दिसून आले. यावेळी दोन्हीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चौकशी केली असता. त्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान दिसून आले. वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्य आद. प्रतिभाताई अवचार यांनी तहसीलदारांशी चर्चा करून त्या भागातील पटवार्यांना चौकशीसाठी पाठवून देऊ व शासनाच्या वतीने जो काही मोबदला मिळेल मोबदला मिळून देऊ अशी आश्वासन देण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत तालुक्यातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय प्रतिभाताई अवचार, ता. अध्यक्ष वैशालीताई कांबळे, महासचिव उज्वलाताई गडलिंग, नगरसेवक तथा गटनेते सुनील शिरसाट, नगरसेवक श्रावण भातखडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते, आनंदराव मते, पंचायत समिती सदस्य रोहिदास राठोड,माजी पंचायत समिती सदस्य सुनील वानखडे, देविदास खंडारे,आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment