बार्शिटाकळीत सर्वांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी... जिल्हा पोलीस अधीक्षक

बार्शिटाकळीत सर्वांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी... जिल्हा पोलीस अधीक्षक 
बार्शिटाकळी प्रतिनिधी...श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : बार्शीटाकळी येते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा कारणावरून नगरपंचायतने ठराव नामंजूर केल्यामुळे शहरात शांतता पुर्व  तनावाचे वातावरण होऊ नये , यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत २८ एप्रिल रोजी शनिवारी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत त त्यांनी सर्व समाजातील नागरिकांना आपल्या गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी व दोन्ही गटाच्या लोकांनी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन त्यावर चर्चा करावी आणि योग्य निर्णय घ्यावा बार्शिटाकळी शहरात सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत त्यासाठी सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन चर्चा करावी आणि शहराच्या हिताचा निर्णय घ्यावा असे आवाहन देखील जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शांतता समितीच्या प्रसंगी केले .
यावेळी बार्शिटाकळी शहरातील सर्व हिंदू मुस्लिम समाजातील बांधव , लोकप्रतिनिधी , नगरपंचायतचे नगराध्यक्ष , महिला पदाधिकारी , पत्रकार मंडळी उपस्थित होती शनिवारी सकाळी ११ वाजता बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला शांतता समितीची बैठक आयोजित केली होती .
यावेळी सहायक पोलीस अधीक्षक  सुरज गुंजाळ, पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील , मूर्तिजापूरचे एचडीपीओ संतोष राऊत , एपीआय स्मिता पाटील बार्शिटाकळीचे ठाणेदार संजय सोळंके , हाजी महेफुज खान नगराध्यक्ष,  माजी सरपंच मासूम खान , माजी जिल्हा परिषद सदस्य आलमगीर खान  ,नगरसेवक सुरेश जामनिक,  नगरसेवक श्रावण भातखडे , शंकर वरघट, नगरसेवक सुनील विठ्ठलराव शिरसाट,  रमेश वाटमारे, अन्सार उल्ला खान , श्रीराम येळवणकार , अनंत केदारे, विनायक टेकाडे,   पुष्पाताई रत्नपारखी , अलका जाधव ,भारत बोबडे , नगरसेवक नसीम खान , तमीज खान , राजेश साबळे , नगरसेवक विनोद राठोड , मो.सादिक लीडर, सैय्यद रियासत, सैय्यद ईमदाद, अशफाक शाह,  अब्दुल अतिक, सैय्यद अबरार, महेफुज उल्ला खान, जेष्ठ पत्रकार जेठाभाई पटेल , मुफीज खान प्रदीप गावंडे, दिलीप जाधव ,शेख इमाम, संजय वाट, शाम ठक, आझम खान, शेख गुफरान , ईमरान खान फ्रुटवाले , अनिल धुरंधर, नकीम मामु , भोला इनामदार,  आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके यांनी केले 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे