जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथील विविध समस्यांची तक्रार......

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथील विविध समस्यांची तक्रार......
बार्शीटाकळी:
 बार्शिटाकळी येथील ग्रामीण रुग्णालयात विविध समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यात यावा याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यात आली . बार्शीटाकळी येथील शासकीय दवाखान्यामध्ये ,सोनोग्राफी करण्यासाठी देण्यात येणारे पत्र फक्तं दोन दिवसच देत आहेत. त्यामुळे ईतर दिवशी रुग्णाला आवश्यकता असतांना सुद्धा पुढील दिवसाची वाट पाहत बसावे लागते . तक्रारकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, सोनोग्राफी करिता पत्र देण्यासाठी ,दोन दिवस न देता हफ्ताभर लिहून देण्यात यावी.तसेच
पिण्याच्या पाण्याची टाकी खराब असल्यामुळे लोकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे रुग्ण त्यांच्या सोबतच्या लोकांना पाण्यापासून उत्पन्न होणाऱ्या आजाराला बळी पडावे लागते. प्रत्येक वॉर्डामध्ये स्वच्छ पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी.आणि
भरती असलेल्या रुग्णास चादर आणि ब्लॅकेट देत नाहीत.त्यांना याबाबत विचारले तर ते असे उत्तर देतात की, चादर आणि ब्लॅकेट धुन्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही आपणाला ते देऊ शकत नाही.जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या सर्व समस्यांची दखल घेऊन त्वरित उपाययोजना करण्यात यावी असे निवेदनातुन म्हटले आहे.
चौकट १ 
ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व सोबतच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
याबाबतीत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्वरित सर्व समस्यांवर उपाययोजना करून विविध समस्या निकाली काढाव्यात.
इमरान खान 
वंचित बहुजन आघाडी
मा. रुग्ण कल्याण सेवा समीती सदस्य 
ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी

चौकट २ 
बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी दररोज सोनोग्राफी करिता पत्र देण्यात येत होते. परंतु याचा परिणाम रोजच्या रुग्ण तपासणीवर होतो व परिणामी रुग्णांना ताटकळत बसावे लागते अशी विनंती त्यावेळी रुग्णकल्याण समीती सदस्यांकडून करण्यात आल्याने फक्तं दोन दिवस सोनोग्राफी करिता ठेवले होते. आता ते पूर्ववत करण्यात येईल.
डॉ.महेश राठोड
वैद्यकीय अधीक्षक
ग्रा. रू. बार्शीटाकळी 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे