बावनकुळे यांच्या विरोधात `वंचित ' ची पोलिसांत तक्रार....

बावनकुळे यांच्या विरोधात `वंचित ' ची पोलिसांत तक्रार....

बार्शीटाकळी येथे दिनांक 26 4 2023 च्या नगरपंचायतच्या मासिक सभेमध्ये बार्शीटाकळी येथील पंचायत समितीच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा याकरिता ठराव घेण्यात आला या ठरावाला नऊ नगरसेवकांनी विरोध केला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हेतू पुरस्कर पणे विरोध करणाऱ्या सदस्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तीन सदस्य होते हे विधान सर्व मीडियासमोर दिले त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची प्रतिमा मलिन झाली तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बार्शीटाकळी पंचायत समिती आवारात बसवण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पंचायत समिती सदस्य व नेते दादाराव पवार यांनी 22 02 2022 ला ठराव मांडून तत्कालीन सभापती प्रकाश वाहूरवाघ यांनी मंजूर केला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केलेले वंचित बहुजन आघाडीचे विरोध करणारे तीन नगरसेवक वंचित बहुजन आघाडीला काही वर्षा अगोदरच सोडून गेले त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे बार्शीटाकळी नगरपंचायत उपाध्यक्ष यांना अविश्वास आणून नगरपंचायत उपाध्यक्ष पदावरून पाय उतार केले ही वस्तुस्थिती असताना जाणीवपूर्वक भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याच्या दृष्टीने विधान केले होते म्हणून आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशन मध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे बदनामी केल्याबाबत व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या बाबत विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा ही तक्रार रामदास पेठ पोलीस स्टेशन मध्ये उपअधीक्षक दुधेगावकर साहेब ठाणेदार बहादुरे यांच्याकडे तक्रार दाखल केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ संगीता ताई अढावु जि प उपाध्यक्ष सुनील फाटकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट महिला बालकल्याण सभापती रिजवाना परवीन शेख शिक्षण सभापती मायाताई नाईक समाज कल्याण सभापती आम्रपालीताई खंडारे, माझी जि प अध्यक्ष पुष्पाताई इंगळे, गजानन  गवई, किशोर जामनिक, मुक्तार भाई, अविनाश खंडारे, दादाराव पवार, पराग गवई, मिलिंद करवते, जय तायडे, संजय नाईक, विलास वाहुरवाघ शीलवंत शिरसाट आनंद खंडारे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे