∆बार्शिटाकळी येथे राष्ट्रसंतांचा जयंती महोत्सव उत्साहात साजरा....

∆बार्शिटाकळी येथे राष्ट्रसंतांचा जयंती महोत्सव उत्साहात साजरा....
∆सेवा मंडळाचे कार्यात तरुण पिढीची नितांत गरज.प्रा.संतोष हुशे


अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत, बार्शिटाकळी तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळाचे वतीने, दिनांक २४ एप्रिल रोजी बार्शिटाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सामुदायिक प्रार्थना मंदिर परिसरामध्ये पुज्यनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ११४ वा जयंती महोत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री रमेशभाऊ वाटमारे यांचे हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. श्री गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक, डॉ संतोषजी हुशे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सामाजिक कार्यकर्ते श्री भारतभाऊ बोबडे हे स्वागताध्यक्ष म्हणून विचार पिठावर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री गुरुदेव वांड:मय विभाग प्रमुख, श्री भानुदास कराळे, जिल्हा सेवाधिकारी श्री शिवाजी दादा म्हैसने, जिल्हा प्रचार प्रमुख श्री श्रीकृष्ण सावळे गुरुजी, जिवन प्रचारक डॉ अशोक रत्नपारखी, सहाय्यक दय्यम निबंधक श्री भारत गुळवे साहेब, जिल्हा युवक प्रमुख श्री राजेन्द्र गाडगे, बार्शिटाकळी तालुका महिला प्रमुख सौ पुष्पाताई रत्नपारखी, अकोला तालुका सेवाधिकारी श्री दिलीप कराळे, अकोला शहर सेवाधिकारी श्री गजानन दादा जालमकर, मध्यवर्ती प्रतिनिधी श्री भुजंगराव देशमुख, ग्रामगीताचार्य श्री रामकृष्ण गावंडे, डिगांबरराव बायस्कर गुरुजी, जिल्हा भजन प्रमुख श्री चंद्रशेखर चतारे गुरुजी, ज्येष्ठ साहित्यिक श्री तुळशिरामजी बोबडे, हरिदासजी रत्नपारखी, श्री श्रीकृष्ण ठोंबरे, मध्यवर्ती प्रतिनिधी संतोष सोनोने, कार्यकारिणी सदस्य नयनकुमार जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ते श्री अनंत केदारे, संतोष राऊत, यांची संस्कार संत श्री आमले महाराज विचारपिठावर विशेष उपस्थिती होती.श्री भानुदास कराळे यांनी, बार्शिटाकळी ही श्री खोलेश्वर नगरी पुज्यनिय राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी आहे.गेली ५० ते ५५ वर्षांपासून या शहरात श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य सुरू आहे.परंपरेने आज ही, ही प्रचारक मंडळी हे कार्य उत्साहाने, शहरातील तसेच तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील लोकांना सोबत घेऊन अविरतपणे करत आहे असे विचार आपल्या भाषणातून मांडले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा संतोषजी हुशे यांनी, या सेवा मंडळाचे कार्यात कुठलाही परिस्थिती आजच्या तरुण पिढीला सामाविष्ट करणे ही काळाची गरज आहे, पुज्यनिय राष्ट्रसंतांच्या विचारांची तरुण पिढीला नितांत गरज आहे असे विचार आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले. त्या नंतर ह भ प श्री अच्युत महाराज पाटील व्याळा यांचे किर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्या नंतर श्री जगदंबा गुरुदेव सेवा भजन मंडळ पुनोती खुर्द, जय गजानन गुरुदेव भजन मंडळ राजनखेड यांनी राष्ट्रसंतांची भजने सादर केली. सायं सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. ह भ प श्री सुभाषराव घुगे राजनखेड यांनी सामुदायिक प्रार्थना या विषयावर चिंतन प्रकट केले.सुत्रसंचालन , तालुका उप सेवाधिकारी प्रा योगेश पाटील सरप यांनी केले. तालुका सेवाधिकारी श्री देविदास कावरे व प्रचार प्रमुख श्री धनंजय ढोरे यांनी उपस्थितांचे तसेच या महोत्सवाला सहकार्य करणाऱ्या सर्व सहयोग दात्यांचे आभार मानले.अशी माहिती श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री प्रदीप पाटील गावंडे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे