सेवानिवृत्ती जुनी पेंशन योजनेसाठी शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बैठक....
सेवानिवृत्ती जुनी पेंशन योजनेसाठी शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बैठक....
∆माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे शुक्रवारी अकोला शहरात.....
अकोला....
2005 पुर्वी नियुक्त व 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती पेंशन योजना लागु करणे, मुंबई येथे 3 मे पासून आझाद मैदानावर होणा-या बेमुदत धरणे आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांचा सहभाग या महत्वाच्या मुद्द्यांवर बुलडाणा येथील विश्रामगृह येथे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत 28 एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षक आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
एका प्रसिध्दी पञकाद्वारे सुचित केले आहे की, 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना नाही. परंतु नुकतेच मध्यवर्ती शासकिय व निमशासकिय आणि अनुदानीत संस्था वरील सर्व कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बेमुदत संप केला आणि सरकारने या प्रश्नावर सकारात्मक भुमिका घेतली. नुकतीच या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासनाने प्रशासकिय अधिका-यांची एक समिती देखील स्थापन केली आहे. यावर निश्चित भविष्यात सकारात्मक तोडगा निघुन सर्व 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती योजना मिळेल, असा विश्वास कर्मचारी वर्गात निर्माण झाला आहे. 2005 पूर्वी नियुक्त परंतु 100% अनुदान नसलेल्या शालेय शिक्षण विभागातील समस्या यापेक्षा थोडी वेगळी आहे. त्यांची स्थिती "न घरका न घाटका" अशी झाली आहे. 2005 पूर्वी सर्व शैक्षणिक पात्रता पुर्ण करून शाळेवर नियुक्ती झाली आहे. परंतु शाळेला 100% अनुदान 2005 नंतर आल्यामुळे त्यांना जी. पी. एफ. खाते नाही आणि डी. सी. पी. एस. किंवा एनपीस खाते देखील नाही. राज्यातील जे काही शिक्षक सेवानिवृत्त झाले ते कुटुंबाच्या उदरनिर्वाहा करिता जोडधंदा करण्यात गुंतले आहे. त्यांचे भविष्य अंधकारमय आहे. राज्यात असे जवळपास 30,000 कर्मचारी आहेत जे टप्याटप्याने 2035 पर्यंत सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांचे भविष्य सांभाळण्यासाठी शिक्षण आघाडी आणि महाराष्ट्र राज्य शाळा कृती समीती यांनी संयुक्तपणे 3 मे पासुन बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर आंदोलन टप्याटप्याने तिव्र करण्यात येणार आहे. जोपर्यंत शासन न्याय देत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार शिक्षण आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्रीकांत देशपांडे आणि महाराष्ट्र राज्य शाळा कृती समीतीचे सचिव माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी केला आहे. राज्यातील इतर शालेय शिक्षण विभागातील संघटनांनी यामध्ये उत्फुर्त सहभाग नोंदवावा आणि सर्व शिक्षकांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे याबाबत 2005 पुर्वी नियुक्त व 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यां समवेत 28 शुक्रवार रोजी अकोला शासकीय विश्राम गृह येथे दुपारी 2:00 वाजता सहविचार सभा घेणार आहेत. तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यमिक व प्राथमीक येथे भेट देणार आहेत. तरी शिक्षक बंधु आणि भगिनींनी आपल्या प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात लेखी निवेदनासह उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र काळे यांच्या वतीने करण्यात येत आहे, अशी माहीती जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कडू यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
===========================================================
Comments
Post a Comment