तीन कोटी पंचवीस लाखाच्या रस्त्याची वंचित बहूजन युवा आघाडीची शोध मोहीम.....
तीन कोटी पंचवीस लाखाच्या रस्त्याची वंचित बहूजन युवा आघाडीची शोध मोहीम.....
कुठल्याही प्रकारचे उद्घाटन झालेले नसताना सिंदखेड ते बार्शीटाकळी ह्या मागील वर्षी तयार केलेल्या रस्त्यावर साईट भराव टाकून सव्वातीन कोटींचा बनावट काम सुरू असून बुलढाणा मधील आंबेटाकळी पासून कापशी ते बार्शीटाकळी ह्या एक वर्षापूर्वी झालेल्या रस्त्यावर साइट भरून तीन कोटी पंचवीस लाख रुपये खर्च करण्यात येत असल्याने वंचित बहूजन युवा आघाडी ने आज शोध मोहीम राबविली.
उद्घाटनाची तारीख न टाकता उदघाटन जाहीर करणाऱ्या भाजप जनप्रतिनिधी च्या रस्ताकामातील भ्रष्टाचार बाबत वंचित बहूजन युवा आघाडी कडून पोलखोल करीत काही दिवसांपूर्वी झालेल्या वृक्ष रोपीत झाडे देखील कंत्राटदार कडून काढून घेण्याचा संतापजनक प्रकार उघडकिस आला आहे.वनविभागाने हे वृक्ष लावले होते, परंतु त्यांना ह्या घटनेची जाणीव असताना वन विभाग मूग गिळून गप्प बसून आहे.आंबेटाकळी हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव असून भरतपूर ते वाडेगाव दिंडी मार्ग तयार झाला आहे, सोबतच कापशी भरतपूर रस्ता काम सुरू आहे.कापशी मार्गे सिंदखेड हा रस्ता अगदी वर्षे भरा आधी झालेला असून सिंदखेड ते बार्शीटाकळी रस्ता देखील तयार आहे.मग आंबेटाकळी ते कापशी बार्शीटाकळी ही नेमकी काय भानगड आहे, असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला.माजी सरपंच राष्ट्रपाल वानखडे, राजदीप वानखडे व सरपंचांनी युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांना तारीख नसलेला फलक आणि उद्घाटन न होता सुरू झालेल्या कामाची माहिती दिली.त्यावर युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रशिक मोरे जिल्हा पदाधिकारी सूबोध डोंगरे, नितीन वानखडे, आनंद खंडारे, भारत निकोसे, अमित मोरे, युवा तालुका अध्यक्ष अमोल जामनिक, आशिष रायबोले, श्रीकृष्ण देवकुणबी, संतोष वणवे , निक्की डोंगरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सव्वातीन कोटीच्या रस्त्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला पाहिजे अशी मागणीही युवा आघाडी ने केली आहे
#vanchitbahujanyuvaaaghadi #VanchitBahujanAghadi #VanchitBahujanAaghadi #JoinVBA #balasahebambedkar #अकोला #VBA #वंचित #prbuddhabharat #BJPFails
Comments
Post a Comment