जनतेला चांगली सेवा द्या -आ. हरिश पिंपळे

जनतेला चांगली सेवा द्या -आ. हरिश पिंपळे
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : तालुक्यातील जनतेला वीज वितरण कंपनीकडून कोणत्याही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन चांगली सेवा द्या असे मत आमदार हरीश पिंपळे यांनी बार्शिटाकळी येथे विद्युत वितरण कंपनीच्या कार्यक्रमात व्यक्त केले. 
शासकीय विश्राम ग्रुह येथे ५ एप्रिल ला आमदार हरिश पिंपळे यांचे अध्यक्षतेखाली विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सभा पार पडली यावेळी विद्युत विभागाचे तालुक्यातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला आमदारांनी तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना सदर समस्या त्वरित सोडवण्याची सांगितले यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजु पाटील काकड , शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मानतकार , नगराध्यक्ष महेफुज खान , जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर , गणेश महल्ले , संजय इंगळे , सुनील ठाकरे , विद्युत वितरण कंपनीचे अशासकीय सदस्य प्रवीण धाईत पंचायत समिती उपसभापती संजय चौधरी , खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष विलास गोरले जि. प. स. गणेश शेळके , रायसिंग राठोड , राहुल गायकवाड , अविनाश डोंगरदिवे , आशिष पवार , निलेश हांडे , बादशहा , अनंता केदारे , विनोद राठोड , योगेश कोदनकर , गजानन लुले , संतोष पागृत , श्रीराम येळवणकार , रमेश वाटमारे , गोपाल वाटमारे , दत्ता साबळे , पिंटू काकड , राम पाटील , वैभव पाटील , शिवहरी भांगरे, संदीप वनारे, सचिन शिंदे, विठ्ठल जानोरकर असे अनेक जण उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अनंता केदारे यांनी तर आभार प्रदर्शन कंपनीचे पाटील यांनी व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे