बार्शिटाकळी येथील किरकोळ लघु व्यवसायिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन...

बार्शिटाकळी  येथील किरकोळ लघु व्यवसायिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन...


बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
 बार्शिटाकळी :  स्थानिक बार्शिटाकळी येथील जुने बस स्टँड आठवडी बाजार समोरील लघुवव्यवसायिक यांनी नगरपंचायत ला निवेदनाद्वारे जुने बस स्टँड आठवडी बाजार समोर छोटी छोटी दुकाने आहेत सदरचे दुकाने आम्ही तात्कालीन ग्रामपंचायत बार्शिटाकळी कडून मागील 30 ते 40 वर्षापासून भाडे तत्त्वावर जागा घेऊन व त्यामध्ये छोटी छोटी दुकाने थाटून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व कुटुंबाचे पालन पोषण व्हावे म्हणून आम्ही किरकोळ रोजगार व्यवसाय सुरू केलेला आहे त्या भरोशावरच आम्ही आमच्या कुटुंबाचे पालन पोषण करतो या दुकानाशिवाय तुमच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही आम्ही तात्कालीन ग्रामपंचायत कडुन भाडे तत्त्वावर घेतलेल्या जागांचे नियमित भाडे कर भरणा करीत आलो आहे ग्रामपंचायतच्या विसर्जनानंतर स्थापन झालेल्या नगरपंचायत कडे सुद्धा आम्ही सदर जागेचा भाडे कर भरणा नियमितपणे करीत आहोत व नगरपंचायतचे सुद्धा आम्ही व्यवसाय करण्यास कोणती आडकाठी नाही .
 माहे जानेवारी 2023 मध्ये आपल्या कार्यालयाकडून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली होती त्यावेळी आमचे दुकाने मागील 30 ते 40 वर्षापासून तात्कालीन ग्रामपंचायतीने जागा भाडेतत्त्वावर देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी किरकोळ व्यवसायाकरिता परवानगी दिल्याने व सलग पणे नगरपंचायतनेसुद्धा ती कायम ठेवल्याने आमच्यावर माहे जानेवारी 2023 मध्ये अतिक्रमण हातावरची कारवाई करण्यात आली नाही तसेच आमच्यावर कारवाई होऊ नये म्हणून आम्ही दिनांक 4 1 2023 रोजी माननीय जिल्हाधिकारी माननीय उपविभागीय अधिकारी माननीय तहसीलदार माननीय पोलीस ठाणेदार व माननीय मुख्याधिकारी यांना वरील विषयाला अनुसरून निवेदन दिले होते मात्र दिनांक 12 5 2023 रोजी दैनिक लोकमत समाचार वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या अतिक्रमणाबाबतच्या नोटीस मुळे आम्हा सर्व किरकोळ व्यवसायिका मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे व यावेळी आपल्यावर कारवाई तर होणार नाही ना या प्रश्नाने आम्ही समस्त किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांची झोप उडाली आहे यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये आपल्या कार्यालयाकडून अतिक्रमण बाबत केलेल्या कारवाईमध्ये जुने बस स्टॅन्ड व आठवडी बाजार समोरील किरकोळ व्यवसायिकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती कारण आम्ही रितसर तात्कालीन ग्रामपंचायत कडून व्यवसाय करिता जागा भाडेतत्त्वावर घेतलेला आहे व नगरपंचायत कडे सुद्धा आम्ही आमचा भाडेकर भरणा नियमितपणे करीत आहोत तरी आपणास या विनंती अर्ज द्वारे विनंती करतो की आम्हाला जुने बस स्टॅन्ड व आठवडी बाजार समोरील किरकोळ व्यवसायिकांना अतिक्रमण कारवाई मधून वगळण्यात यावे व आमच्यावर कोणत्याही प्रकारची अतिक्रमणाची कारवाई करण्यात येऊ नये तसे झाल्यास आम्हा सर्व किरकोळ व्यवसायिकांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येईल व आमचा उत्पन्नाचा एकमेव मार्ग कायमचा बंद होईल परिणामी आमचे संपूर्ण कुटुंबाची उपासमार होईल व आम्ही देशोधडीला लागू व त्यामुळे आलेल्या नैराश्यातून भविष्यात कोणती अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील तरी महोदय आम्हाला अतिक्रमण मोहिमेमधून वगळण्यात यावे व आमचा किरकोळ व्यवसाय वाचवावा जेणेकरून आम्ही या किरकोळ व्यवसायाच्या भरोशावर आमच्या कुटुंबीयांचे पालन पोषण व मुलांचे शिक्षण व लग्नकार्य करू शकु अशा प्रकारचे निवेदन माननीय मुख्याधिकारी बार्शिटाकळी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी मॅडम अकोला , जिल्हा पोलीस अधीक्षक , उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर , उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तीजापुर, तहसीलदार बार्शिटाकळी, तसेच पोलीस  निरीक्षक यांना या निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर मोहम्मद युसुफ मोहम्मद समद,  सूर्यकांत अलोने , सय्यद अझरुलहक ,नवाज अहमद,  अनिल गावंडे , गजानन बोपुलकर , देवराव भातखडे , नागोराव भातखडे डे , अनिल पळसकर  , सुनील पळसकर , पांडुरंग भातखडे , नूर मोहम्मद , सै समीर , विनोद शेवलकर ,मोहम्मद अयाज , मोहम्मद रफीक , हरिश्चंद्र ईरच्छे शेख जुनेद , जायदा बी सै. अन्सार,  अरविंद राऊत , प्रकाश पोहरे  ,त्र्यंबक जामनिक , मोहम्मद अयाज , उमेश मानेकर , साबीर खान , वसंता ठाकरे , नागोराव राऊत , गोपाल निंबोकार राजू मस्के,  संतोष पतींगे, श्रीराम येळवणकर , गणेश मस्के , प्रवीण भातखडे  , सखावत खा, शेख अझहर , आधी किरकोळ व्यवसायिकांच्या सह्या आहेत

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे